'स्ट्रोक'साठी सर्वसमावेशक आराखडा! समिट आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली महाराष्ट्र स्ट्रोक समिटमध्ये तज्ज्ञांची चर्चा
राज्यात स्ट्रोकमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्वाचे वाढते प्रमाण लक्षात घेता स्ट्रोक उपचार व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी व्यापक आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आयुष्मान भारत योजनेंतर्गत स्ट्रोक उपचारांसाठी थ्रोम्बोलिसिस, समर्पित स्ट्रोक केअर युनिट्स आणि मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमीसारख्या प्रगत उपचारांचा समावेश केल्याने रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध होण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. इंडियन मेडिकल पार्लमेंटेरियन्स फोरम (आयएमपीएफ) आणि युरोपियन बिझनेस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत आयोजित महाराष्ट्र स्ट्रोक समिटमध्ये ते बोलत होते.(फोटो सौजन्य – istock)
Obesity Issue: जास्त वजन आहे? नियमित आरोग्य तपासणी का गरजेची, शरीर आतून पोखरतंय; गंभीर परिणाम
या परिषदेला मेडट्रॉनिकने नॉलेज पार्टनर म्हणून सहकार्य केले. भारतात मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या आजारामध्ये स्ट्रोकचा चौथा क्रमांक असून विकलांगत्वाच्या कारणांमध्ये तो पाचव्या क्रमांकावर आहे.
स्ट्रोकमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्वाच्या बाबतीत महाराष्ट्र देशातील पहिल्या दहा राज्यांमध्ये असल्याने सार्वजनिक जनजागृती, वेळेवर निदान आणि तातडीच्या उपचारांसाठी अत्याधुनिक अतिदक्षता पायाभूत सुविधा उभारण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
परिषदेत स्ट्रोक उपचार व्यवस्थेतील सध्याच्या त्रुटींचा आढावा घेऊन शाश्वत उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली, उच्च दर्जाचे उपचार वेळेवर उपलब्ध व्हावेत यासाठी राज्यात स्ट्रोक केअर सेंटर्सची स्थापना आणि सक्षमीकरण करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली.
केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी ‘भारतातील स्ट्रोक व्यवस्थापनाचे विलनिकल पुरावे (आयसीएमआर व पीआरएएएन अभ्यास) या विषयावर माहिती दिली. तर केईएम रुग्णालयाचे प्राध्यापक आणि युनिट प्रमुख डॉ. नितीन एन. डांगे यांनी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत स्ट्रोक उपचारांचा समावेश आणि आवश्यक पाठबळ यावर भाष्य केले.
मोबाइल ॲपवरून कळणार कर्करोगाचा धोका; टाटा रुग्णालय विकसित करतंय खास मोबाइल ॲप
स्ट्रोक हा भारतातील गंभीर सार्वजनिक आरोग्य प्रश्न आहे. शहरी भागांसह राज्यभर वेळेवर उपचार उपलब्ध करून देण्यासाठी समन्वित आणि प्रणालीबद्ध प्रयत्नांची आवश्यकता आहे. डॉ. अनिल बोंडे, अध्यक्ष,इंडियन मेडिकल पार्लमेटेरियन्स फोरम, यांनी यावर मत व्यक्त केले आहे.






