
आतड्यांमध्ये जमा झालेला मल क्षणार्धात पडून जाईल बाहेर! आरोग्य सुधारण्यासाठी नियमित करा 'या' फळांचे सेवन
कोणत्या फळांचे सेवन केल्यास थकवा कमी होतो?
फळांच्या सेवनामुळे शरीराला होणारे फायदे?
उच्चरक्तदाब वाढण्याची कारणे?
दैनंदिन आहारात कायमच तिखट, तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केले जाते. पण पौष्टिक आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन केले जात नाही. यामुळे आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. फळांचे सेवन केल्यामुळे शरीर निरोगी राहतो. पण काहींना फळे खायला अजिबात आवडत नाही. फळांचे नाव ऐकल्यानंतर नाक मुरडतात. फळांमध्ये असलेले विटामिन सी, कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम शरीर, त्वचा आणि केसांसाठी अतिशय प्रभावी ठरतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणता आजार झाल्यानंतर कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांच्या सेवनामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते, त्वचेवरील पिंपल्स कमी होऊन त्वचा चमकदार होते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार आणि पोषक आहार घेणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – istock)
गोड चवीचा पपई बद्धकोष्ठतेसाठी प्रभावी ठरतो. चुकीचा आहार, सतत बाहेरील पदार्थांचे सेवन, चुकीच्या वेळी जेवण इत्यादी गोष्टींच्या परिणामामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, गॅस, अपचन इत्यादी समस्या वाढू लागल्यानंतर शरीरातील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात नियमित वाटीभर पपई किंवा ताज्या पपईचा रस बनवून प्यावा. यामध्ये असलेल्या फायबरमुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते. तसेच पपईमध्ये नैसर्गिक एन्झाईम्स आढळून येतात.
बऱ्याचदा त्वचेवर अतिरिक्त तेल जमा झाल्यानंतर त्वचा खूप जास्त तेलकट आणि चिकट होऊन जाते. चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम, फोड येऊन त्वचा खूप जास्त निस्तेज होते. त्यामुळे त्वचेसंबंधित सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या बेरीजचे सेवन करावे. बेरीजमध्ये विटामिन सी आणि विटामिन ए मोठ्या प्रमाणावर आढळून येते. चेहऱ्यावर आलेली सूज कमी करण्यासाठी वेगवेगळ्या बेरीज खाव्यात. यामुळे त्वचेच्या पेशी सुधारतात. चमकदार आणि तेजस्वी त्वचेसाठी नियमित आहारात फळांचा समावेश करावा.
बऱ्याचदा शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागल्यास सकाळी उठल्यानंतर नियमित दोन केळी खावी. नियमित केळी खाल्ल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. केळीमध्ये पोटॅशियम आणि ग्लुकोज या दोन्ही गोष्टी जास्त प्रमाणात आढळून येतात. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. आशेवली नियमित दोन केळी खावी.
उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्यानंतर आहारात वेगवेगळ्या हंगामी फळांचे सेवन करावे. फळांचे सेवन केल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. कलिंगड आणि संत्रींमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे शरीरातील सोडियमचा प्रभाव संतुलित राहतो आणि रक्ताच्या गुठळ्या होत नाही. रक्तवाहिन्यांना आराम देण्यासाठी नियमित फळांचे सेवन करावे.
Ans: रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि शरीराला निरोगी ठेवतात.
Ans: सकाळी नाश्त्यासोबत किंवा दुपारच्या जेवणाआधी फळे खाणे सर्वात फायदेशीर मानले जाते. रात्री उशिरा खाणे टाळावे.
Ans: होय, आंबा, केळी, बेदाणे, खजूर, अंजीर यांसारखी गोड आणि पिकलेली फळे दुधासोबत खाऊ शकता.