Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटात गॅस झाल्यानंतर अस्वस्थता जाणवते? मग ‘हे’ घरगुती उपाय केल्यास अपचनाच्या समस्येपासून मिळेल सुटका

पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे आतडे स्वच्छ होतात आणि पोटात वाढलेला गॅस कमी होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 19, 2026 | 01:33 PM
पोटात गॅस झाल्यानंतर अस्वस्थता जाणवते? मग 'हे' घरगुती उपाय केल्यास अपचनाच्या समस्येपासून मिळेल सुटका

पोटात गॅस झाल्यानंतर अस्वस्थता जाणवते? मग 'हे' घरगुती उपाय केल्यास अपचनाच्या समस्येपासून मिळेल सुटका

Follow Us
Follow Us:

अपचनवरील घरगुती उपाय?
गॅसच्या समस्येवर घरगुती उपाय?
पचनक्रिया सुधारण्यासाठी घरगुती उपाय?

दैनंदिन आहारात सतत तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यास पचनक्रिया बिघडते. याशिवाय कामाची धावपळ, कोणत्याही वेळ जेवणे, अपुरी झोप, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. खाण्यापिण्याच्या वेळा चुकल्यानंतर आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. पचनक्रिया बिघडल्यानंतर ऍसिडिटी, उलट्या, मळमळ आणि पित्त होण्याची जास्त शक्यता असते. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे अन्ननलिकेमध्ये अन्नाचे बारीक कण तसेच साचून राहतात. ज्यामुळे आंबट ढेकर येणे, घशाजवळ पित्त वाढणे, जळजळ इत्यादी लक्षणे दिसू लागतात. जेवणानंतर पोटात वाढलेला जडपणा कमी करण्यासाठी आणि ऍसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या गोळ्या औषधांचे सेवन करतात. पण यामुळे फारसा परिणाम दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोटात वाढलेला गॅस आणि अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)

जेवताना कधी आणि किती प्रमाणात पाण्याचे सेवन करावे? जाणून घ्या किती पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया राहील मजबूत

पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी उपाय:

पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यासाठी ओवा आणि काळ्या मिठाचे एकत्र सेवन करावे. यासाठी तव्यावर ओवा हलकासा भाजून घ्यावा. त्यानंतर ओव्याची पावडर करून गरम पाण्यात मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात काळे मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. यामुळे पोटात वाढलेला गॅस कमी होण्यासोबतच शरीरातील घाण बाहेर पडून जाईल. ओव्यांमध्ये असलेले गुणकारी घटक पोटात वाढलेला जडपणा आणि गॅस कमी करण्यास मदत करतात.

आल्याच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये जमा झालेला गॅस कमी होतो. यासाठी चमचाभर आल्याच्या रसात मध मिक्स करून प्या. त्यानंतर त्यावर कोमट पाणी प्यायल्यास पोटात जमा झालेली सगळी घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. पोटात जमा झालेल्या घाणीमुळे डोकेदुखी आणि अपचन होते. यावर उपाय म्हणून आलं खावे. आल्यामध्ये नैसर्गिक दाहक-विरोधी आणि पाचक गुणधर्म आढळून येतात.

गॅसवर अतिशय प्रभावी उपाय म्हणजे बडीशेपचे पाणी. जेवणानंतर नियमित बडीशेप चावून खाल्ल्यास अन्नपदार्थ पचन होतात आणि तोंडाच्या दुर्गंधीपासून आराम मिळतो. तसेच बडीशेपचे पाणी प्यायल्यास गॅस कमी होण्यास मदत होईल. यासाठी एक ग्लास पाणी टोपात घेऊन उकळवून घ्यावे. त्यानंतर त्यात बडीशेप घालून चांगली उकळी काढून घ्या. उकळी आलेले पाणी गाळून थंड करून सेवन करा.

आळस नव्हे, आरोग्याचा मंत्र! स्मरणशक्तीपासून एकाग्रतेपर्यंत… वामकुक्षीचे वैज्ञानिक फायदे जाणून घ्या

वारंवार तुम्हाला गॅस, अपचनाची समस्या जाणवत असेल तर उपाशी पोटी पुदिन्याची पाने चावून खावीत. पुदिन्याची पाने खाल्ल्यामुळे गॅस, छातीत जळजळ व अपचन कमी होण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते. पुदिन्याच्या पानांमध्ये असलेला थंडावा शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यास मदत करतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ॲसिडिटीची लक्षणे काय आहेत?

    Ans: छातीत किंवा पोटाच्या वरच्या भागात जळजळ होणे, तोंडात आम्लपित्त येणे.

  • Que: ॲसिडिटीची प्रमुख कारणे कोणती?

    Ans: जास्त मसालेदार, तेलकट, तळलेले आणि फास्ट फूड खाणे.

  • Que: ॲसिडिटीवर झटपट घरगुती उपाय काय आहेत?

    Ans: एक ग्लास थंड दूध प्यायल्याने जळजळ कमी होते, सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे फायदेशीर आहे

Web Title: Then doing these home remedies will get rid of the problem of indigestion health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • acidity
  • gas
  • home remedies

संबंधित बातम्या

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट
1

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती
2

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
3

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.