गर्भधारणा राहिल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये महिलांच्या शरीरात दिसून येतात 'हे' मोठे बदल
महिलांच्या शरीरात वयाच्या प्रत्येक टप्पात सतत काहींना काही बदल होत असतात. असेच बदल गर्भधारणा राहिल्यानंतर सुद्धा होऊ लागतात. आई होणं ही जगातील सगळ्यात सुंदर आणि प्रेमाची भावना आहे. त्यामुळे गर्भधारणा राहिल्यानंतर महिलांच्या शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. बऱ्याचदा मासिक पाळी चुकल्यानंतर महिला गर्भधारणेची तपासणी करत खात्री करतात. पण या चाचणीशिवाय इतरही अनेक बदल शरीरात होत असतात. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराला काहीवेळा हानी पोहचण्याची शक्यता असते. गर्भधारणेच्या दिवसांमध्ये शरीरात होणारे बदल मासिक पाळी येण्याच्या काही दिवस आधी सुद्धा शरीरात दिसू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
आतड्यांमध्ये वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीरात कायम राहील थंडावा
शरीरात सतत होणारे हार्मोन्सचे असंतुलन किंवा इतरही अनेक कारणांमुळे महिलांच्या शरीरात बदल होऊ लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गर्भधारणेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला गुड न्यूज ओळखणे कठीण वाटणार नाही. गर्भधारणा राहिल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे.
गर्भधारणा राहिल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. गर्भधारणा झाल्यानंतर शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सची पातळी वाढू लागते. यामुळे काहीवेळा स्तनांमध्ये वेदना होऊ लागतात. स्तनामध्ये वाढलेल्या वेदना बऱ्याचदा अतिशय तीव्र होतात. यामुळे काहीवेळा स्तनांमध्ये जडपणा वाटणे, सूज येणे किंवा वेदना होऊ लागतात.
गर्भधारणा राहिल्यानंतर शरीराच्या रक्तप्रवाहात वाढ होते आणि मूत्राशयावर ताण येण्याची शक्यता जास्त वाढते. त्यामुळे कमी प्यायल्यानंतर सुद्धा वारंवार लघवीला जावेसे वाटते. मासिक पाळीच्या आधी शरीरात ही लक्षणे जास्त दिसून येत नाही. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हार्मोन्सच्या असंतुलनामुळे आणि शरीरात नव्याने होणाऱ्या बदलांमुळे महिलांना बऱ्याचदा थकवा अशक्तपणा जाणवू लागतो. कोणतेही काम करण्याची जास्त इच्छा होत नाही. अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील ऊर्जेची पातळी पूर्णपणे कमी होऊन जाते. अशावेळी जास्त वेळ आराम करणे आवश्यक आहे. मासिक पाळी येण्याच्या आधी शरीरात सौम्य थकवा जाणवू लागतो.
गर्भधारणेच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये सतत उलट्या होणे, मळमळ होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. कोणताही पदार्थ खाल्यानंतर लगेच उलटी करावीशी वाटते, खाल्यानंतर साखर मळमळ होऊ लागते. वारंवार उलट्या झाल्यास डॉक्टरांचा साल घ्यावा.