सांध्यांमधील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात करा 'या' गोड पदार्थांचे सेवन
बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला ताण, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. यामुळे अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे शरीराला पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करून आहारात पौष्टिक आणि गुणकारी पदार्थांचे सेवन करावे. अनेकदा घरात पचनसंबंधित समस्या उद्भवल्यास गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. गूळ खाल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या दूर होतात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं गूळ खायला आवडते. गोड पदार्थ बनवताना साखर वापरण्याऐवजी गुळाचा वापर करावा. यामुळे शरीरात वाढलेला मधुमेह नियंत्रणात राहतो आणि आरोग्य सुधारते. दैनंदिन आहारात साखरेचा वापर करण्याऐवजी गुळाचा वापर करावा.(फोटो सौजन्य – iStock)
व्हर्टिगोमुळे सतत डोकं दुखत आणि चक्कर येते? जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेली महत्वपूर्ण माहिती
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर गोड पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे साखर न खाता तुम्ही आहारात गुळाचे सेवन करू शकता. यामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दैनंदिन आहारात गुळाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. गूळ खाल्यामुळे आरोग्य सुधारते.
शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात गुळाचे सेवन करावे. गूळ खाल्यामुळे गॅस, अपचन आणि ऍसिडिटीपासून सुटका मिळते. दुपारच्या वेळेस किंवा रात्रीचे जेवण झाल्यानंतर एक छोटा तुकडा गूळ खाल्यास पचनक्रिया कधीच बिघडणार नाही. शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी आहारात गूळ खावे.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. हे पदार्थ पोटात तसेच साचून राहिल्यामुळे किडनी आणि आतड्यांचे आरोग्य बिघडते. याशिवाय काहीवेळा रक्तात हानिकारक घटक तसेच साचून राहतात. गुळाचे सेवन केल्यानंतर त्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यास [पोटात साचून राहिलेली घाण स्वच्छ होईल आणि आरोग्य सुधारेल. शरीर डिटॉक्स करण्यासाठी गुळाचे सेवन करणे फायदेशीर आहे.
गुळाचे सेवन केल्यामुळे रक्तात साचून राहिलेले हानिकारक घटक बाहेर पडून जातात. याशिवाय रक्त शुद्ध होते आणि शरीराला अनेक फायदे होतात. गुळाचे सेवन नियमित केल्यास थकवा, अशक्तपणा आणि रक्ताची कमतरता दूर होते. यामध्ये आयर्न सप्लिमेंट आढळून येतात. गूळ खाल्यामुळे शरीराचे कमी झालेले हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
हल्ली वयाच्या तिशीमध्येच अनेकांचे सांधे दुखणे, हातापायांमध्ये वेदना होणे, शारीरिक हालचाली करताना शरीर सतत दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित गुळाचे सेवन करावे. यामध्ये आढळून येणारे अँटी-इंफ्लेमेटरी घटक सांधेदुखी आणि स्नायूंच्या वेदनांपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करतात.