बेंबी सरकल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय
नाभी कोणत्या कारणांमुळे पुढे सरकते?
नाभी सरकल्यास कोणते उपाय करावेत?
बेंबी सरकल्यावर दिसणारी लक्षणे?
चुकीचा व्यायाम, कोणतेही जड सामान उचलणे, वेगाने हालचाल करणे, सतत पुढे वाकणे इत्यादी अनेक कारणांमुळे नाभी पुढे सरकण्याची शक्यता असते. नाभी हे शरीराचे ऊर्जा स्थान मानले जाते. पण नाभी पुढे सरकल्यानंतर शरीरात अनेक धोकादायक बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष करणे शरीरासाठी जीवघेणे ठरते. नाभी सरकल्यानंतर तीव्र मळमळ, उलट्या, जुलाब किंवा वारंवार होणाऱ्या पोटदुखी इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. मूळ जागेवर नाभी येईपर्यंत भयंकर त्रासाला सामोरे जावे लागते. जे पर्यंत नाभी तिच्या मूळ ठिकाणी येत नाही तोपर्यंत पचनाचे विकार काही केल्या शांत होत नाहीत. हा त्रास कोणत्याही वयातील महिलांसह पुरुषांना सुद्धा होऊ शकतो. बेंबी सरकल्यानंतर बऱ्याचदा डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार केले जातात. पण यामुळे कोणताच फरक दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बेंबी सरकल्यानंतर आजीबाईच्या बटव्यातील कोणते उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
मूळ जागेवरून बेंबी सरकल्यानंतर शरीराला खूप जास्त त्रास सहन करावा लागतो. यामुळे पचनाचे विकार होण्याची जास्त शक्यता असते. सगळ्यात आधी ओटीपोटात तीव्र वेदना होतात. या वेदना बऱ्याचदा सहन सुद्धा होत नाहीत. त्यानंतर बद्धकोष्ठता, छातीत जळजळ, खालच्या बाजूला सरकल्यास जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू होऊन संपूर्ण शरीराला हानी पोहचते. पचनक्रिया बिघडल्यानंतर खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाहीत. चालताना किंवा खाली वाकताना खूप जास्त वेदना होतात. बेंबी तिच्या मूळ जागेवर येईपर्यंत भूक न लागणे आणि सतत मळमळणे यांसारखी लक्षणे दिसून येतात आणि शरीरात थकवा जाणवतो.
बेंबी सरकल्यानंतर कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करण्याऐवजी आजीबाईच्या बटव्यातील प्रभावी उपाय करावेत. यासाठी रिकाम्या पोटी बडीशेप आणि गूळ खाल्ल्यास बेंबी मूळ जागेवर येईल. बडीशेप खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. यामुळे पोटावर वाढलेला तणाव कमी होतो. बडीशेप खाणे शरीरासाठी अतिशय सुरक्षित आहे. पोटातील गॅस आणि जळजळ कमी करण्यासाठी बडीशेप आणि गुळाचे सेवन करावे.
पूर्वीच्या काळी आरोग्यासंबंधित समस्या उद्भवल्यानंतर अनेक वेगवेगळे उपाय केले जायचे. त्यातील अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे बेंबी सरकल्यास दिवा ठेवणे. नाभीवर छोटा दिवा पेटवून त्यावर काचेची वाटी किंवा तांब्या उलट्या घातला जायचा. यामध्ये नाभीचा भाग हळूहळू वर केला जातो. यामुळे थोडा वेळात नाभी मूळ जागेवर येते. हा उपाय सहज कोणीही करू शकत. यामुळे नाभी मूळ जागेवर येईल आणि तात्काळ आराम मिळेल.
Ans: हे एक पारंपारिक आरोग्य संकल्पना आहे, ज्यात नाभी त्याच्या मूळ मध्यवर्ती स्थानावरून सरकते, ज्यामुळे शरीरातील ऊर्जा प्रवाह आणि पचनसंस्थेवर परिणाम होतो असे मानले जाते.
Ans: आघात, पोटाची शस्त्रक्रिया, जास्त वजन वाढणे, चुकीची जीवनशैली किंवा चुकीच्या पद्धतीने बसणे/झोपणे यामुळे नाभी सरकू शकते.
Ans: अचानक पोटदुखी, गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, आम्लपित्त.






