Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किडनीचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ भयानक लक्षणे, दुर्लक्ष केल्यास पाणी पचवणे देखील होते अवघड

शरीरातील कोणत्याही अवयवाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यातील अतिशय भयानक कॅन्सर म्हणजे किडनी कॅन्सर. हा कॅन्सर झाल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडते. जाणून घ्या किडनी कॅन्सरची शरीरात दिसणारी लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 23, 2025 | 03:25 PM
किडनीचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' भयानक लक्षणे

किडनीचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' भयानक लक्षणे

Follow Us
Close
Follow Us:

किडनी शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. शरीरात साचून राहिलेले घटक बाहेर बाहेर काढून टाकण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी किडनीचे कार्य निरोगी असणे आवश्यक आहे. दैनंदिन आहारात होणाऱ्या छोट्या मोठ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. पचनसंबंधित समस्या, अपुरी झोप, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम किडनीच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो.किडनीसंबंधित गंभीर आजार झाल्यानंतर सुरवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. मात्र या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. किडनीसंबंधित आजार झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणत्याच वेदना होत नाहीत.(फोटो सौजन्य – iStock)

उन्हाळ्यात घामामुळे शरीराची आग होते? मग शांत आणि आरामदायी झोपेसाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

शरीरात कॅन्सरच्या गाठी झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे नियमित निरोगी जीवन जगणे आवश्यक आहे. किडनीचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. किडनीच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होण्यास सुरुवात झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला किडनीचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

लघवीमधून रक्त येणे:

किडनीचा कॅन्सर झाल्यानंतर प्रामुख्याने दिसून येणारे लक्षण म्हणजे लघवीतून रक्त येणे. याला हेमॅट्यूरिया असे म्हणतात. कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सौम्य लक्षणे दिसतात. मात्र हीच लक्षणे बऱ्याचदा लक्षात येत नाहीत. त्यामुळे लघवीचा रंग लाल किंवा गुलाबीसर दिसू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.

कंबरेत वेदना होणे:

किडनीसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर पाठीमध्ये वेदना होऊ लागतात. किडनीच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात आणि ट्युमर तयार होऊ लागतो. ट्युमरची गाठ तयार झाल्यानंतर कंबरेत किंवा पाठीमध्ये वेदना होतात. मात्र याच गाठी वाढल्यामुळे कंबरदुखी आणि पाठदुखी मोठ्या प्रमाणात वाढू लागते. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.

तंबाखू किंवा गुटखा खाऊन लाल झालेले दात स्वच्छ करण्यासाठी ‘या’ फळांच्या सालीचा करा वापर, दात होईल मोत्यासारखे पांढरेशुभ्र

वजन अचानक कमी होणे:

कोणत्याही कारणाशिवाय अचानक वजन कमी होत असल्यास डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा. किडनी कॅन्सरच्या गंभीर लक्षणांपैकी एक म्हणजे अचानक वजन कमी होत जाणे. शरीरात वाढलेल्या कॅन्सरच्या पेशी निरोगी पेशींवर हल्ला करतात, ज्यामुळे शरीराचे कार्य बिघडते. यामुळे शरीराची पोषण शक्ती पूर्णपणे कमी होऊन जाते. वजन झपाट्याने कमी झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These are the terrifying symptoms that appear in the body after kidney cancer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 03:25 PM

Topics:  

  • cancer
  • kidney damage
  • Kidney Health Tips

संबंधित बातम्या

दैनंदिन आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास किडनी सडून होईल मुतखडा, चुकूनही करू नका नियमित सेवन
1

दैनंदिन आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास किडनी सडून होईल मुतखडा, चुकूनही करू नका नियमित सेवन

१७ वर्षीय तरुणीच्या हदयातील Cancer ची गाठ काढण्यात यश, दुर्धर आजारावर मात
2

१७ वर्षीय तरुणीच्या हदयातील Cancer ची गाठ काढण्यात यश, दुर्धर आजारावर मात

Worst Food For Kidney: किडनी सडवतात 8 पदार्थ, नाश्त्यात भरभरून खात आहेत लोक, 1 दिवसात होतील स्टोन
3

Worst Food For Kidney: किडनी सडवतात 8 पदार्थ, नाश्त्यात भरभरून खात आहेत लोक, 1 दिवसात होतील स्टोन

Nafisa Ali: लाईफ इन अ मेट्रो…’ अभिनेत्रीचा गंभीर आजाराशी लढा; सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट
4

Nafisa Ali: लाईफ इन अ मेट्रो…’ अभिनेत्रीचा गंभीर आजाराशी लढा; सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.