हार्मोनल इम्बॅलेन्समुळे नक्की काय घडते (फोटो सौजन्य - iStock)
शरीरातील हार्मोन्सचा स्तर कमी-जास्त होणे म्हणजे होर्मोनस असंतुलन. तज्ज्ञांच्या मते, भारतातील दर दहा महिलांपैकी एका महिलेला ‘हार्मोनल इम्बॅलन्स’ची समस्या असते. जिम सप्लिमेंट्सपासून ते स्किनकेअर उत्पादनांपर्यंत, बीपीए, बीसीएए, मायक्रोप्लास्टिक्स आणि तीव्र सुगंध यांसारखे पदार्थ हार्मोनल आरोग्यात व्यत्यय आणू शकतात आणि प्रजनन क्षमतेला हानी पोहोचवू शकतात.
बीसीएए सप्लिमेंट्स हे जिममध्ये जाणाऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आणि सामान्य आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याचा अतिरेक केल्याने महिलांमध्ये इन्सुलिन संतुलन आणि ओव्हुलेशनमध्ये व्यत्यय येऊ शकतो.सुगंधित क्रीम्स आणि लोशन यामध्ये अनेकदा फॅथलेट्स आणि पॅराबेन्स असतात, जे हार्मोन्समध्ये व्यत्यय आणतात. विशेषतः गरम केलेल्या प्लास्टिकचा वारंवार वापर केल्यास कालांतराने प्रजनन क्षमता कमी होण्याची शक्यता असते.
कोणत्या गोष्टींचा त्रास
परफ्यूम, डिओडोरंट्स, शॅम्पू, खेळणी आणि अगदी अन्न कंटेनरमध्ये देखील फॅथलेट्सचा समावेश असतो. फॅथलेट्स पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करतात आणि महिलांमध्ये अंड्यांची गुणवत्ता कमी करतात. गर्भधारणेदरम्यान प्रजनन क्षमता कमी होणे अशा समस्या उद्भवतात.
World IVF Day: तिशीत केले जाणारे आयव्हीएफ आणि 40 वयातील आयव्हीएफमधील फरक
या घटकांचा समावेश असलेली उत्पादने वापरणे टाळा:
काय सांगतात तज्ज्ञ
डॉ. बुशरा खान, फर्टिलिटी स्पेशालिस्ट, नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, खराडी, पुणे यांनी सांगितले की, तुमच्या हार्मोनल आणि प्रजनन आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी कृत्रिम सुगंधाचा वापर न केलेल्या ( fragrance free) उत्पादनांची निवड करा. प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी काचेच्या किंवा स्टेनलेस-स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या वापरा, बीसीएए उत्पादनं घेण्यापूर्वी लेबल्स वाचा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या, प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये मायक्रोवेव्ह केलेले अन्न पदर्थांचे सेवन टाळा, हायड्रेटेड रहा आणि फायबरयुक्त आहाराचे सेवन करा. यामुळे तुमची समस्या कमी होईल.
World IVF Day: आयव्हीएफला सुरुवात करण्याआधी मानसिक तयारी किती गरजेचे, तज्ज्ञांनी दिल्या खास टिप्स
आई व्हायचे असल्यास
तुम्हाला मनापासून आई व्हायचे असेल तर तुम्ही वर दिलेल्या गोष्टीचा वापर कमी करा. तुम्हाला माहीतही नसते की या गोष्टींचा नक्की तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होत असतो आणि त्यामुळे तुम्ही हा लेख वाचायलाच हवा. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्सवर परिणाम होत असतो आणि हा परिणाम टाळण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील हे नक्की. त्यामुळे वेळीच या पदार्थांचा वापर बंद करा अथवा करणे टाळा आणि आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याचा प्रयत्न करा.