वर्ल्ड आयव्हीएफ डे च्या निमित्ताने जाणून घ्या महत्त्वाची माहिती (फोटो सौजन्य - iStock)
तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत आहात का? सोप्यात सोप्या पद्धतीने गर्भधारणा कशी होईल यासाठीचे मार्ग तुम्ही नक्कीच शोधत असाल. गर्भधारणा तपासणीच्या अहवालाची वाट पाहतानाचा एक-एक क्षण तासाप्रमाणे भासत असेल. आणि जर अहवाल निगेटिव्ह आला तर निराशा, ताणतणाव हे ठरलेलेच असते. बाळ होण्यात येणाऱ्या अडचणी ही जगभरातील अनेक महिलांची समस्या आहे.
आकडेवारी सांगते की, जवळपास १० ते १४ टक्के भारतीयांना वंध्यत्वाची समस्या भेडसावते आणि याचा दर शहरी भागात जास्त आहे. आयव्हीएफसाठी मानसिक तयारीमध्ये निरोगी जीवनशैली, ताणतणावांचे व्यवस्थापन आणि भावनिक पाठिंबा यावर लक्ष केंद्रित करा. डॉ. हितेशा रामनानी रोहिरा, कन्सल्टंन्ट, IVF कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई यांनी सांगितलेल्या आयव्हीएफच्या प्रवासात पुढील गोष्टी उपयोगी ठरतील, जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
IVF प्रक्रियेला घाबरुन जाऊ नका, तज्ज्ञांचा सल्ला
फर्टिलिटी कन्सल्टन्टचा सल्ला घ्या, आयव्हीएफ प्रक्रिया नीट समजून घ्या. लक्षात ठेवा की, आयव्हीएफ पहिल्याच प्रयत्नांत यशस्वी न होण्याचीदेखील शक्यता असते. सकारात्मक दृष्टिकोन ढळू नये यासाठी या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याचा आनंद घ्या.