'या' चुकांमुळे आतड्यांमध्ये चिटकून राहते घाण!
शरीरातील प्रत्येक लहान मोठा अवयव निरोगी आरोग्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. त्यातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे आतड्या. शरीरात दोन प्रकारच्या आतड्या असतात. एक म्हणजे लहान आतड्या आणि मोठ्या आतड्या. पण बऱ्याचदा आहारात होणाऱ्या बदलांमुळे आतड्यांचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. सतत जंक फूड, तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनाची समस्या उद्भवते आणि पोटात गॅस तयार होणे, आतड्यांमध्ये घाण जमा होणे, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. पचनक्रिया अतिशय कमकुवत झाल्यानंतर खाल्ले अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. त्यामुळे आहारात कायमच हेल्दी आणि सहज पचन होतील असेच पदार्थ खावेत.(फोटो सौजन्य – istock)
बऱ्याचदा पोट आणि आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या घाणीकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे पोटात दुखणे, मळमळ, उलट्या किंवा इतर अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात. शरीरात साचलेले विषारी घटक संपूर्ण शरीराच्या पचनसंस्थेवर गंभीर परिणाम करतात. ज्यामुळे काहीवेळा लिव्हर आणि किडनीचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये घाण का साचून राहते? आतड्या स्वच्छ करण्यासाठी कोणते उपाय करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
अन्नपदार्थांच्या सेवनामुळे शरीराला फायबर मिळते. पण फायबरची कमतरता निर्माण झाल्यानंतर खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होत आणि आतड्यांमध्ये विषारी मल तसाच साचून राहतो. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर पचनक्रियेत अनेक अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी तशीच साचून राहते. पचनक्रिया कायमच निरोगी ठेवण्यासाठी शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. आपल्यातील अनेकांना जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असते. पण असे केल्यामुळे खाल्ले अन्नपदार्थ पचन होत नाहीत.
आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लिंबू पाण्याचे सेवन करावे. नियमित लिंबू पाणी प्यायल्यास पोट आणि आतड्यांमध्ये साचलेली घाण बाहेर पडून जाईल. यामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे आतड्यांमधील मल बाहेर पडून जाण्यास मदत होते.
लाखो वर्षांपासून भारतीय लोक हाताने का जेवतात? जाणून घ्या शरीराला होणारे आश्चर्यकारक फायदे
पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये कोमट पाण्याचे सेवन करावे. कोमट पाणी प्यायल्यामुळे आतड्यांमध्ये साचलेला विषारी मल बाहेर पडून जातो आणि पोट स्वच्छ होते. याशिवाय सकाळी उठल्यानंतर हर्बल आणि आयुर्वेदिक मसाल्यांनी समृद्ध असलेल्या चहाचे किंवा काढ्याचे सेवन करावे.
आतड्याचे आरोग्य म्हणजे काय?
तुमच्या आतड्यात असलेले सूक्ष्मजंतू (gut microbiome) तुमच्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ते पचन, रोगप्रतिकारशक्ती आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. आतड्याचे आरोग्य चांगले असेल, तर तुम्ही निरोगी राहता.
आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी काय करावे?
फळे, भाज्या, कडधान्ये, आणि प्रोबायोटिक-समृद्ध पदार्थांचे (दही, ताक, इडली, डोसा) सेवन करा,. शारीरिक हालचाली आतड्याच्या कार्यासाठी चांगली असते.
आतड्यासाठी हानिकारक काही पदार्थ:
जास्त साखर, प्रक्रिया केलेले अन्न, जास्त चरबी, अल्कोहोल, कॅफीन.