
'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये अंड्याच्या आतील पिवळा भाग, कोणत्याही क्षणी येईल हार्ट अटॅक आणि सायंटिस्टचा धोका
अंड्याच्या आतील पिवळा पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराचे होणारे नुकसान?
कोणत्या व्यक्तींनी अंड्याच्या आतील पिवळा पदार्थ खाऊ नये?
अंड खाण्याचे शरीराला होणारे फायदे?
रोजच्या जेवणात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यात अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे अंड. काहींना नियमित २ अंडी खाण्याची सवय असते. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी उकडलेली अंडी खाल्ल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. अंड्यामध्ये प्रोटीन आढळुन येते. नाश्ता, स्नॅक्स किंवा वर्कआउटनंतर काहींना अंडी खाण्याची सवय असते. बऱ्याचदा लहान मुलांसह मोठे सुध्दा अंड्याच्या पांढऱ्या भागाचे सेवन करुन पिवळा भाग फेकून देतात. नियमित दोन अंड्याचे सेवन केल्यास सपेशी मजबूत करणे, इम्युनिटी सुधारवणे, थकवा कमी करणे इत्यादी अनेक फायदे शरीराला होतात. अंड्याच्या आतील पिवळा भाग सगळ्यांसाठी चांगला नाही. पिवळा भाग खाल्यामुळे आरोग्यासंबधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच आज आज आम्ही तुम्हाला अंड्यांच्या आतील पिवळ्या भागाचे कोणत्या व्यक्तींनी सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
शरीरात वाढलेले उच्च कोलेस्ट्रॉल संपूर्ण आरोग्यावर गंभीर परिणाम करते. त्यामुळे शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात तिखट आणि अतितेलकट पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. अंड्याच्या आतील पिवळ्या भागामध्ये कोलेस्ट्रॉल वाढवणारे घटक आढळून येतात, ज्याचा संपूर्ण आरोग्यावर घातक परिणाम दिसून येतो. शरीरात उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांना इजा पोहचते, ज्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो.
मागील काही वर्षांमध्ये मधुमेहाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना टाईप २ मधुमेहाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. टाईप २ मधुमेहाची लागण झालेल्या रुग्णांना हार्ट अटॅक किंवा हृदयाच्या आजारांची लागण झपाट्याने होते. त्यामुळे मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांनी अंड्याच्या आतील पिवळ्या थराचे अजिबात सेवन करू नये. कारण यामध्ये उच्च फायबर, लीन प्रोटीन आणि हेल्दी फॅट मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी अंड्याच्या आतील भागाचे अजिबात सेवन करू नये.
काहींना अंड खाल्यानंतर एलर्जी होण्याची शक्याता असते. त्वचेवर रॅश येणे, त्वचा लाल होणे, चेहऱ्यावर रॅश येणे, खाज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते.याशिवाय काहींना एनाफिलेक्सिस होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेसंबंधित समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी अंड्याच्या आतील पिवळ्या भागाचे अजिबात सेवन करू नये.तसेच कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या आणि रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या औषधांचे सेवन करत असलेल्या व्यक्तींनी अंड्याच्या आतील पिवळ्या भागाचे अजिबात सेवन करू नये.
Ans: रक्तात आणि शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये आढळणारा मेणासारखा पदार्थ आहे.
Ans: २०० मिलीग्राम/डीएल पेक्षा कमी असावे.
Ans: उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका वाढतो.