Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही तास आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच ओळ्खल्यास वाचू शकतो जीव

हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही तास आधी शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे सुद्धा आवश्यक आहे. हार्ट अटॅक येण्याच्या काही तास आधी दिसून येतात ही लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 26, 2026 | 08:44 AM
हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही तास आधी शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, वेळीच ओळ्खल्यास वाचू शकतो जीव

हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही तास आधी शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, वेळीच ओळ्खल्यास वाचू शकतो जीव

Follow Us
Close
Follow Us:

हार्ट अटॅक येण्याची कारणे?
स्त्रियांमध्ये हार्ट अटॅकची दिसून येणारी लक्षणे?
हार्ट अ‍ॅटॅक येऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता, अपुरी झोप, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. शारीरिक हालचालींचा अभाव आणि जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे शरीराला हानी पोहचते. हार्ट अटॅकचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या पायांखालील जमीन सरकते. हार्ट अटॅक आल्यानंतर कोणत्याही होऊ शकतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे फार गरजेचे आहे. शरीरात उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेला पिवळ्या रंगाचा चिकट थर नसांमध्ये साचून राहतो. यामुळे हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही. हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. हृदयाला ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे रक्त पंप करतात हृदयाला जास्तीची मेहनत घ्यावी लागते. मधुमेह झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका येण्याची जास्त शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला हार्ट अटॅक येण्याच्या काही तास आधी शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

लहान वयात मधुमेह होण्यामागे काय आहेत कारण? सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार

हार्ट अटॅक येण्याच्या काही तास आधी दिसून येणारी लक्षणे:

श्वास घेण्यास त्रास होणे:

कोणतेही कष्टाची कामे न करता शरीरात जर वारंवार थकवा, अशक्तपणा जाणवत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. याशिवाय चालताना तुम्हाला जर धाप लागत असेल तर हे हृदयविकाराचे गंभीर लक्षण आहे. याशिवाय काहीवेळा हृद्यासह शरीराच्या इतर भागांमध्ये सुद्धा वेदना जाणवू लागतात. हृद्य शरीराच्या इतर भागांकडे व्यवस्थित रक्त पंप न करू शकल्यामुळे फुफ्फुसांवर दाब वाढतो आणि श्वास घेण्यास त्रास होतो. याशिवाय जिने चढताना किंवा उतरताना श्वास घेण्यास अडथळे निर्माण होत निर्माण असेल वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

शरीराच्या इतर भागांत वेदना:

हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी केवळ छातीमध्येच नाही शरीराच्या इतर भागांमध्ये सुद्धा वेदना होतात. अनेकदा खांदे, मान, जबडा, पाठ किंवा हातांमध्ये वेदना जाणवू शकतात. अनेकदा या वेदना छातीकडून हातांकडे किंवा मानेकडे सरकताना वेदना वाढतात. स्त्रियांना हार्ट अटॅक येण्याच्या काहीदिवस आधी केवळ छातीमध्येच नाही तर पाठीत तीव्र वेदना होतात. पुरुषांमध्ये पाठीत वेदना होण्याचे प्रमाण कमी आहे. बऱ्याचदा जबड्यात वेदना वाढल्यास दातदुखी वाढल्यास पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

केवळ 2 मिनिट्समध्ये Blood Pressure वर येईल नियंत्रण! कार्डियोलॉजिस्टने सांगितला सर्वात सोपा उपाय

थकवा आणि अशक्तपणा:

शरीरात कोणत्याही कारणाशिवाय थकवा, अशक्तपणा जाणवत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत. स्त्रियांमध्ये हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी खूप जास्त थकवा अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे वेळीच उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी. साधे चालल्यानंतर किंवा कोणतेही साधे काम केल्यानंतर जर शरीरात थकवा वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हृदयविकाराचा झटका म्हणजे काय?

    Ans: जेव्हा हृदयाच्या स्नायूंना रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कोरोनरी धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, तेव्हा हृदयाच्या पेशी मरु लागतात.

  • Que: हृदयविकाराची प्रमुख लक्षणे कोणती?

    Ans: छातीच्या मध्यभागी तीव्र दाब, जडपणा, जळजळ किंवा घट्टपणा जाणवणे.

  • Que: 'सायलेंट हार्ट अटॅक' म्हणजे काय?

    Ans: अनेकदा हृदयविकाराचा झटका येतो पण त्यात स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत किंवा लक्षणे अत्यंत सौम्य असतात, याला सायलेंट हार्ट अटॅक म्हणतात.

Web Title: These serious symptoms appear in the body hours before a heart attack can save lives if recognized in time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • heart attack awareness
  • heart blockage
  • Heart Disease

संबंधित बातम्या

कोणत्याही क्षणी येईल Heart Attack! शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या सविस्तर
1

कोणत्याही क्षणी येईल Heart Attack! शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.