लहान वयात मधुमेह होण्यामागे काय आहेत कारण? सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार
टाईप २ मधुमेह कशामुळे होतो?
लहान वयात मधुमेह होण्याची कारणे?
मधुमेहाची गंभीर लक्षणे?
पूर्वीच्या काळी मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजरांची लागण वयाच्या ६० व्या वर्षानंतर व्हायची. पण धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता, अपुरी झोप, चुकीच्या वेळी जेवण इत्याद अनेक गोष्टींच्या परिणामामुळे तरुण वयातच मधुमेह आणि इतर आजारांचे प्रमाण वाढले आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचते. सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. मधुमेह म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण बाहेर काढून टाकणे. ज्यावेळी शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा तयार झालेल्या इन्सुलिनचा योग्य वापर होत नाही, तेव्हा रक्तातील साखर पेशींपर्यंत न पोहचता रक्तात जमा होण्यास सुरुवात होते. रक्तात जमा झालेल्या साखरेमुळे संपूर्ण शरीराला हानी पोहचते. मधुमेहासारखा गंभीर आजार केवळ तरुण वयातील लोकांचं नाहीतर लहान मुलांना सुद्धा होतो. सुमारे १० कोटींहून अधिक भारतीय मधुमेहाने त्रस्त आहेत.(फोटो सौजन्य – istock)
मागील ५ वर्षांमध्ये १५ ते २५ वयोगटातील तरुणांमध्ये ‘टाईप २’ मधुमेहाचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढले आहे. मधुमेहाची लागण झाल्यानंतर संपूर्ण आयुष्यभर गोळ्या औषधांवर राहावे लागते. हा आजार केवळ शारीरिक आरोग्याचं नाहीतर मानसिक आरोग्य सुद्धा बिघडून टाकतो. त्यामुळे लहान मुलांना कमीत कमी गोड पदार्थ खाण्यास द्यावे. मधुमेह हा केवळ अनुवांशिक आजार नसून चुकीची जीवनशैली जगल्यामुळे होणारा गंभीर आजार आहे. कोणत्याही वयातील मुलामुलींना मधुमेह होऊ शकतो.
रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. आहारात ‘कॉम्प्लेक्स कार्ब्स’ असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय साखर आणि मैदा असलेले पदार्थ खाणे टाळावे. याशिवाय दिवसभरातून किमान ४० ते ४५ मिनिटं चालावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी ३०% पर्यंत कमी होईल.आहारात कोणत्याही गोड पदार्थांचे अजिबात सेवन करू नये.
Ans: मधुमेह ही एक चयापचय स्थिती आहे जिथे शरीर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकत नाही. स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही.
Ans: वारंवार लघवी होणे, खूप तहान लागणे, सतत थकवा जाणवणे.
Ans: साखर, मैदा, प्रक्रिया केलेले अन्न टाळा. फायबरयुक्त पदार्थ, भाज्या आणि कडधान्ये खा.






