वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होतो? आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे अतिसेवन, आहारात होणारे बदल, अल्कोहोल, पाण्याची कमतरता, तिखट मसालेदार पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराचे नुकसान होते. जगभरात कॅन्सर सारख्या गंभीर आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत. कॅन्सर झाल्यानंतर संपूर्ण शरीराचे आरोग्य बिघडते. हल्ली आतड्यांच्या कॅन्सरचे रुग्ण वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामानय लक्षणे दिसून येतात. पण कालांतराने लक्षणे वाढू लागल्यानंतर सुद्धा दुर्लक्ष केले जाते. यामुळे कोणत्याही क्षणी मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे कॅन्सरची लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
आतड्यांचा कॅन्सरचे योग्य वेळी निदान झाल्यास उपचार घेणे सहज शक्य आहे. आहारात होणाऱ्या बदलांचा आणि चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर होतो आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची शरीराला लागण होते. आज आम्ही तुम्हाला आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर महित्यी सांगणार आहोत. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने उपचार करणे आवश्यक आहे.
आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीला मलविसर्जनाच्या सवयींमध्ये अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे अतिशय सामान्य समस्या समजून दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर वारंवार होणारी मळमळ, बद्धकोष्ठतेचा त्रास किंवा सतत जुलाब इत्यादी गंभीर लक्षणे शरीरात दिसून येतात. याशिवाय काहीवेळा पातळ, रिबनसारखा स्टु होतो.
आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर काहीवेळा मलामधून रक्त पडू लागते. शरीरातून रक्त बाहेर पडून गेल्यामुळे थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. काहीवेळा मूळव्याध झाल्यानंतर सुद्धा शौचातून रक्त पडू लागते. त्यामुळे शरीरातील कोणत्या अवयवातून रक्त आल्यानंतर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
ओटीपोटात जडपणा जाणवतो पण वेदना होत नाहीत? ‘हे’ उपाय करून मिळवा कायमचा आराम, चुकूनही करू नका दुर्लक्ष
आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर पोटात वेदना होणे, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कॅन्सर झाल्यानंतर आतड्यांच्या हालचालींमध्ये बिघाड होतो, ज्यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होत नाहीत. यामुळे शरीराच्या कोणत्याही अवयवात वेदना होतात. रक्तस्त्राव झाल्यामुळे अॅनिमियासारखी गंभीर स्थिती उद्भवते.
कोलन कर्करोग म्हणजे काय?
कोलन कर्करोग हा ‘कोलोरेक्टल कर्करोग’ (Colorectal Cancer) या व्यापक प्रकारातील एक कर्करोग आहे, जो मोठ्या आतड्याच्या (कोलन) सर्वात मोठ्या भागात सुरू होतो.
आतड्यांच्या कॅन्सरची लक्षणे:
पोटात दुखणे, गॅस किंवा क्रॅम्प्स, बद्धकोष्ठता, शौचावाटे रक्त पडणे किंवा शौचाचा रंग गडद होणे, शौचाची भावना असूनही पूर्णपणे रिकामे न वाटणे इत्यादी लक्षणे शरीरात दिसून येतात.