झोपल्यानंतर मध्यरात्री १ ते ३ दरम्यान कायमच जाग येते? मग उद्भवू शकतो लिव्हरसबंधित आजारांचा धोका
कायमच निरोगी राहण्यासाठी शरीराला अन्नपदार्थांसोबतच झोप सुद्धा महत्वाची आहे. विश्रांती घेतल्यामुळे आरोग्य सुधारते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य कायमच निरोगी ठेवण्यासाठी नेहमीच ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. लिव्हर शरीराची असंख्य कामे करतो. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकणे, रक्त शुद्ध करणे, खाल्ले अन्नपदार्थ पचन करणे इत्यादी कामे लिव्हर करते. त्यामुळे लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते.(फोटो सौजन्य – istock)
ओटीपोटात जडपणा जाणवतो पण वेदना होत नाहीत? ‘हे’ उपाय करून मिळवा कायमचा आराम, चुकूनही करू नका दुर्लक्ष
बऱ्याचदा रात्री झोपल्यानंतर १ ते ३ च्या दरम्यान काहींना कायमच जाग येते. ही समस्या झोपेसंबंधित नसून लिव्हरच्या आजाराचे संकेत आहेत. लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. पण या बदलांकडे दुर्लक्ष केले जाते. पण वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे लिव्हरसबंधित गंभीर आजार होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
काहींना सतत तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याची सवय असते. पण चुकीच्या वेळी तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते आणि आतड्यांना हानी पोहचते. पोटाला सूज आल्यानंतर पोटात किंवा ओटीपोटात वेदना वाढू लागतात. या वेदना वाढू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध उपचार करणे आवश्यक आहे.
लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे संपूर्ण आरोग्य बिघडते. तसेच लघवीचा रंग बदलणे, पिवळ्या रंगाचे स्टू इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. लघवीचा रंग खूप जास्त गडद झाल्यानंतर युरीन इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते.
Explainer: कफ सिरपमधील डायएथिलिन ग्लायकॉल नक्की काय आहे? यामुळे झाला 11 मुलांचा मृत्यू
लिव्हर शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचे काम करतो. पण झोपेमध्ये अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरातील कोर्टिसोल, मेलाटोनिन आणि इन्सुलिन हार्मोन्सचे असंतुलन होते. ज्यामुळे फॅटी लिव्हर, इन्सुलिन रेझिस्टन्स इत्यादी लिव्हरसबंधित गंभीर समस्या उद्भवतात. झोपेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि इंफ्लिमेशं वाढते.
यकृताच्या नुकसानाची सामान्य लक्षणे:
हिरड्यांमधून रक्त येणे किंवा शौचावाटे रक्त जाणे, ओटीपोटात अस्वस्थता किंवा वेदना, जास्त झोप येणे आणि झोपेचे चक्र विस्कळीत होणे, खाण्याची इच्छा कमी होणे इत्यादी लक्षणे शरीरात दिसून येतात.
यकृताचे नुकसान टाळण्यासाठी:
अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा, संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या, नियमित व्यायाम करा आणि वजन नियंत्रित ठेवा, यकृताच्या आरोग्याबद्दल चिंता वाटत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
यकृताच्या नुकसानाची कारणे:
शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे यकृताचे नुकसान होऊ शकते, जास्त मद्य सेवन यकृतासाठी हानिकारक आहे,पेटायटीससारखे विषाणू यकृताला संक्रमित करू शकतात.