नसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणे
धावपळीची जीवनशैली, कामाचा तणाव, आहारात होणारे बदल, अपुरी झोप, मानसिक तणाव, विटामिनची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात सतत होणाऱ्या बदलांकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र वारंवार दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. शरीरात दिसून येणाऱ्या बदलांकडे लक्ष देऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. हल्ली सगळ्यांचं नसांसंबधित समस्या उद्भवू लागल्या आहेत. मान, हात, पाय किंवा शरीराच्या इतर अवयवांवरील नसा दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक लोक लक्ष देत नाही. मात्र लक्ष न दिल्यामुळे हेच छोटे आजार मोठे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
बऱ्याचदा जास्त वेळ उभे राहिल्यानंतर किंवा एका जागेवर बसून राहिल्यानंतर पायांमध्ये वेदना होऊ लागतात. तर काहींच्या पायांमध्ये मुंग्या येणे किंवा पाय सुन्न पडून जातो. वारंवार तुमच्या पायांमध्ये जडपणा जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. ही समस्या रिकोज व्हेंसच्यासमस्येमुळे उद्भवू शकते. यामुळे नसांमधील रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात.
किडनीसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर पायांना सूज येते. तसेच चुकीच्या रक्तपरावाहामुळे सुद्धा पायांना सूज येण्याची जास्त शक्यता असते. पायांच्या खालच्या भागात नेहमीच सूज किंवा वेदना होत असतील तर खराब ब्लड सर्कुलेशन किंवा नसांमध्ये रक्त जमा झाल्याचे संकेत आहेत. यामुळे शरीरात थकवा किंवा अशक्तपणा जाणवू लागतो. शरीराच्या आतील भागांमध्ये होणारे बदल बऱ्याचदा आरोग्यासंबंधित गंभीर आजारांचे संकेत असतात.
व्हेरिकोज व्हेन्स किंवा स्पायडर व्हेन्स ही ब्युटी संबंधित समस्या आहे. नसांना सूज आल्यानंतर वेदना होण्यास सुरुवात होते. नसांच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय नसांमध्ये वाढलेल्या वेदनांमुळे हातापायांना झालेली जखम लवकर बरी होत नाही. तसेच त्वचेचा रंग सुद्धा बदलू लागतो. त्वचेचा रंग भुरका, जांबळा किंवा लाल होऊन जातो.
वयाच्या ६० व्या वर्षी राहाल कायम फिट आणि तरुण! पाणी पिण्याचे ‘हे’ नियम आरोग्यासाठी ठरतील वरदान
मज्जातंतूंचे आजार म्हणजे काय?
मज्जातंतूंचे आजार म्हणजे शरीरातील मज्जातंतूंना होणारे विकार. हे विकार मज्जातंतूंना नुकसान पोहोचवतात, ज्यामुळे विविध शारीरिक कार्ये बाधित होऊ शकतात.
मज्जातंतूंच्या आजारांची कारणे काय आहेत?
मधुमेह, ऑटोइम्यून रोग, विषाणू इत्यादी कारणांमुळे मज्जातंतूचे आजार होण्याची शक्यता असते.
मज्जातंतूंच्या आजारांची लक्षणे कोणती?
हाता-पायांमध्ये वेदना, मुंग्या येणे किंवा जळजळ होणे, हाता-पायांमध्ये सुन्नपणा किंवा संवेदना कमी होणे.स्नायू कमकुवत होणे किंवा त्यांचे कार्य कमी होणे, चालताना किंवा वस्तू पकडताना अडचण येणे, चक्कर येणे किंवा तोल जाणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.