कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सतत हाडे दुखतात? मग रोजच्या आहारात करा 'या' शाहाकारी पदार्थांचे सेवन
शरीरातील हाडे कायम निरोगी राहण्यासाठी कॅल्शियम अतिशय महत्वाचे आहे. त्वचा, केस, नख, शरीरातील इतर पेशी निरोगी राहण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात कॅल्शियम असणे आवश्यक आहे. मात्र वाढत्या वयात शरीरात कॅल्शियम आणि प्रोटीनची कमतरता जाणवू लागते. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडांमध्ये वेदना होणे, गुडघे दुखणे, नख तुटणे किंवा अंगावर पांढरे डाग येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शरीरात योग्य प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असणे आवश्यक आहे. अनेक लोक कॅल्शियम आणि प्रोटीन वाढवण्यासाठी आहारात चिकन, अंडी आणि माशांचे सेवन करतात. मात्र या पदार्थांव्यतिरिक्त तुम्ही आहारात शाहाकरी पदार्थांचे सेवन करू शकता. आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणते पदार्थ खावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
वयाच्या ६० व्या वर्षी राहाल कायम फिट आणि तरुण! पाणी पिण्याचे ‘हे’ नियम आरोग्यासाठी ठरतील वरदान
क्विनोआमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले अमिनो ॲसिड्स आढळून येते. त्यामुळे रोजच्या नाश्त्यात किंवा आहारात तुम्ही क्विनोआ बनवून खाऊ शकता. एक कप पातळ क्विनोआमध्ये सुमारे 8 ग्रॅम प्रोटीन आणि 5 ग्रॅम फायबर आढळून येते. याशिवाय हा पदार्थ लगेच शिजतो आणि पचनास सुद्धा अतिशय हलका आहे. रोजच्या आहारात क्विनोआचे सेवन केल्यास शरीरात निर्माण झालेली प्रोटीन आणि कॅल्शियमची कमतरता दूर होईल.
आपल्यातील अनेकांना पनीर खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही टोफू किंवा सोया पनीर खाऊ शकता. या पदार्थांच्या नियमित सेवनामुळे शरीरात निर्माण झालेली कॅल्शियम आणि प्रोटीनची कमतरता दूर होईल. टोफूमध्ये प्रोटीनसोबतच आयर्न, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर आढळून येते. एका टोफूच्या तुकड्यामध्ये 10 ते 15 ग्रॅमपर्यंत प्रोटीन असते. त्यामुळे जेवणातील पदार्थ बनवताना तुम्ही टोफूचा वापर करू शकता.
दही खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. दही खाल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. सकाळच्या नाश्त्यात वाटीभर ग्रीक दह्याचे सेवन करावे. त्यामुळे फळांसोबत किंवा ओट्ससोबत तुम्ही ग्रीक दही खाऊ शकता. ग्रीक दही बाजारात सहज उपलब्ध होते. प्रोबायोटिक्सने समृद्ध असलेले ग्रीक दही आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे.
पावसाळ्यात का वाढतो डायरियाचा धोका? ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या आरोग्याची काळजी, बिघणार नाही तब्येत
कॅल्शियम म्हणजे काय?
कॅल्शियम हा एक आवश्यक पोषक घटक आहे, जो शरीराच्या योग्य कार्यासाठी आवश्यक असतो. विशेषतः हाडे आणि दातांसाठी कॅल्शियम महत्वाचे आहे. तसेच, स्नायू, मज्जातंतू आणि हृदयाच्या कार्यासाठी देखील कॅल्शियमची आवश्यकता असते.
कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे काय आहेत?
हाडे ठिसूळ होणे: सांधेदुखी, कंबरदुखी, आणि फ्रॅक्चरचा धोका वाढणे.
स्नायू पेटके येणे: हाता-पायांमध्ये गोळे येणे, स्नायू दुखणे.
गर्भवती महिला आणि कॅल्शियमची कमतरता?
गर्भवती महिलांना कॅल्शियमची जास्त गरज असते. त्यामुळे कॅल्शियमची कमतरता असल्यास, स्नायू पेटके येणे, हाता-पायांमध्ये मुंग्या येणे, आणि फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढू शकतो, असे एका आरोग्य संकेतस्थळाने म्हटले आहे.






