सकाळी झोपेतून उठल्यानंतर शरीरात दिसून येतात थायरॉइडची 'ही' लक्षणे
रात्री उशिरा झोपल्यानंतर सकाळी लवकर उठण्याचा सगळ्यांचं कंटाळा येतो. पण बऱ्याचदा सकाळी झोपेतून उठल्यानंतर थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. याशिवाय चेहऱ्यावर सूज येणे, हातापायांना सूज येणे, सतत मूड स्विंग होणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. सकाळी उठल्यानंतर शरीरात दिसून येणारी ही लक्षणे आरोग्यासंबंधित गंभीर आजाराचे संकेत दर्शवतात. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. बिघडलेली जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. कोणत्याही वयात महिलांना थायरॉइड होतो. यामुळे महिलांचे आरोग्य पूर्णपणे बिघडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला थायरॉइड म्हणजे काय? थायरॉइड झाल्यानंतर सकाळी शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
फॅटी लिव्हरसाठी वरदान ठरेल ‘हे’ काळे पेय! लिव्हर सिरोसिस- कॅन्सरचा धोका होईल कमी, नियमित करा सेवन
थायरॉईड म्हणजे गळ्यामध्ये असणारी एक ग्रंथी. ही ग्रंथी थायरॉईड हार्मोन्स तयार करते, जे शरीराच्या चयापचय क्रियेसाठी आणि इतर कार्यांसाठी आवश्यक असतात. थायरॉईड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित चालू नसल्यास थायरॉईड होण्याची शक्यता असते. थायरॉईडच्या विकारांचे निदान करण्यासाठी रक्त तपासणी केली जाते, ज्यामध्ये TSH, T3 आणि T4 पातळी तपासतात.
८ तासांची चांगली आणि शांत झोप घेतल्यानंतर सुद्धा शरीरात जर थकवा, अशक्तपणा किंवा सुस्तपणा जाणवत असेल तर हे हायपोथायरॉइडचे संकेत आहेत. सकाळी उठल्यानंतर शरीरात जाणवणारा जडपणा आरोग्यासंबंधित गंभीर आजाराचे संकेत आहे. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे.
थायरॉइड झाल्यानंतर सकाळी उठल्यावर चेहरा फुगलेला किंवा डोळ्यांखाली सूज येते. डोळ्यांखाली वारंवार सूज येत असल्यास दुर्लक्ष न करता तातडीने उपचार करावे. थायरॉइड झाल्यानंतर शरीराच्या कोणत्याही अवयवाला सूज येऊ शकते.
थायरॉइड झाल्यानंतर वारंवार केस गळणे, त्वचेवर तेज कमी होणे, त्वचा कोरडी पडणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. ही समस्या खास करून सकाळच्या वेळी अंघोळ केल्यानंतर दिसून येते.
जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. पण तुमच्या शरीराचे कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होत असेल किंवा वाढत असेल तर दुर्लक्ष न करता थायरॉइड चाचणी करणे आवश्यक आहे. कारण थायरॉइड झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.
थायरॉईडचे विकार म्हणजे काय?
थायरॉईड ग्रंथी जास्त किंवा कमी प्रमाणात हार्मोन्स तयार करू शकते, ज्यामुळे विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात. याला थायरॉईडचे विकार म्हणतात.
थायरॉईडचे मुख्य प्रकार कोणते?
हायपोथायरॉईडीझम:जेव्हा थायरॉईड ग्रंथी पुरेसे हार्मोन्स तयार करत नाही.हायपरथायरॉईडीझम: जेव्हा थायरॉईड ग्रंथी जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार करते.
थायरॉईड विकारांवर उपचार काय आहेत?
थायरॉईड हार्मोन्सची पातळी सामान्य करण्यासाठी औषधे दिली जातात. जास्त हार्मोन्स तयार करणाऱ्या थायरॉईड ग्रंथीच्या भागांना निष्क्रिय करण्यासाठी वापरले जाते.काहीवेळा थायरॉईड ग्रंथीचा काही भाग किंवा पूर्णपणे काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते.