Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकेंड करा आणखीन खास, घरी बनवा मार्केट स्टाईल क्रिस्पी चिकन नगेट्स; पार्टीजसाठी परफेक्ट रेसिपी

Chicken Nuggets Recipe: बाहेरील कुरकुरीत आवरण आणि आतमध्ये मसालेदार चिकन... विचार करा यांची चव काय अप्रतिम लागेल. विकेंडसाठी, पार्टीजसाठी अथवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आ

  • By नुपूर भगत
Updated On: May 30, 2025 | 11:38 AM
विकेंड करा आणखीन खास, घरी बनवा मार्केट स्टाईल क्रिस्पी चिकन नगेट्स; पार्टीजसाठी परफेक्ट रेसिपी

विकेंड करा आणखीन खास, घरी बनवा मार्केट स्टाईल क्रिस्पी चिकन नगेट्स; पार्टीजसाठी परफेक्ट रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

नॉनव्हेज लव्हर्ससाठी कुरकुरीत चिकन नगेट्स हे त्याच्या आवडीचे स्नॅक्स आहेत. बाहेरून कुरकुरीत आवरण आणि आतमध्ये ज्यूसी चिकन चवीला अप्रतीम लागते. अनेकदा बाहेर खायला गेलो की हा पदार्थ लोकांच्या लिस्टमध्ये असतोच. आजकाल याचे फ्रोजन पॅकेट्स देखील बाजारात उपलब्ध आहेत. पण फ्रोजन पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले नाहीत अशात हा कुरकुरीत स्नॅक तुम्हीच घरीच तयार करू शकता.

वेस्टर्न पदार्थाला इंडियन टच; घरी बनवा बटाट्यापासून तयार होणारा कुरकुरीत हॅश ब्राऊन

पार्टीसाठी, स्नॅक्स म्हणून किंवा अगदी संध्याकाळच्या खाण्यासाठी ही एकदम योग्य आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशा या नगेट्स बनवायला अगदी सोपे आहेत आणि घरीही सहज करता येतात. विशेष म्हणजे ही रेसिपी फार सोपी, सहज आणि झटपट तयार होणारी आहे. घरी अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्हाला हा पदार्थ सर्व्ह करू शकता. अथवा या पावसाळी वातावरणातही तुम्ही या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता. थंड वातावरणात गरमा गरम चिकन नगेट्स तुमच्या शरीराला उष्णता देतील. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • चिकन (बारीक कापलेले किंवा कापून कीमा केलेले) – २५० ग्रॅम
  • लसूण – ४-५ पाकळ्या (किसून किंवा ठेचून)
  • आले – १ इंच तुकडा (किसलेला)
  • हिरव्या मिरच्या – १-२ (कापून)
  • बारीक चिरलेला कोथिंबीर – २ टेबलस्पून
  • मिरपूड – १/२ टीस्पून
  • लिंबाचा रस – १ टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • अंडी – १
  • मैदा – २ टेबलस्पून
  • ब्रेडक्रम्ब्स – १ कप
  • तेल – तळण्यासाठी

ब्रेडचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत रव्याचे सँडविच, घाईगडबडीमध्ये झटपट तयार होईल पदार्थ

कृती

  • चिकन नगेट्स तयार करण्यासाठी सर्वप्रथम चिकन कीमा (किंवा बारीक चिरलेले चिकन) एका मोठ्या भांड्यात घ्या
  • त्यात आले, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, मिरपूड, मीठ आणि लिंबाचा रस घाला
  • आता या मिश्रणात एक अंडं आणि मैदा घालून सगळं नीट मिक्स करा. हवे असल्यास मिक्सरमध्ये थोडं वाटून एकसंध मिक्स तयार करा
  • तयार मिश्रण थोडं वेळ फ्रीजमध्ये ठेवा (१०-१५ मिनिटं), जेणेकरून ते सेट होईल आणि नगेट्स तयार करताना सोपं जाईल
  • आता या मिश्रणाचे लहान लहान नगेट्सच्या आकाराचे गोळे करून हाताने दाबा (नगेट्सचा आकार द्या)
  • हे नगेट्स ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवा, जेणेकरून ते कुरकुरीत होतील
  • कढईत तेल गरम करा आणि नगेट्स मध्यम आचेवर तळा. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत यांना चांगले तळून घ्या
  • तळलेले नगेट्स टिशू पेपरवर काढा, जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल
  • गरमागरम चिकन नगेट्स टोमॅटो सॉस, मयोनीज किंवा तुमच्या आवडत्या डिपसोबत सर्व्ह करा
  • हे नगेट्स पार्टीसाठी स्टार स्नॅक बनू शकतात

Web Title: These weekend make tasty and crispy chicken nuggets at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 11:38 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

संध्याकाळच्या नाश्त्यात टेस्टी पदार्थ खायचा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheese Corn Sandwich, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी
1

संध्याकाळच्या नाश्त्यात टेस्टी पदार्थ खायचा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheese Corn Sandwich, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

Upvas Recipe : नवरात्री स्पेशल; भगरीपासून सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट आणि कुरकुरीत डोसा
2

Upvas Recipe : नवरात्री स्पेशल; भगरीपासून सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट आणि कुरकुरीत डोसा

१० मिनिटांमध्ये घरी सोप्या पद्धतीत बनवा कुरकुरीत लसूण चटणी, महिनाभर व्यवस्थित टिकून राहील पदार्थ
3

१० मिनिटांमध्ये घरी सोप्या पद्धतीत बनवा कुरकुरीत लसूण चटणी, महिनाभर व्यवस्थित टिकून राहील पदार्थ

Kanyapujan : कन्यापूजनासाठी काळ्या चण्याची भाजी कशी तयार करायची? प्रोटीन, फायबर आणि लोहाने भरपूर रेसिपी
4

Kanyapujan : कन्यापूजनासाठी काळ्या चण्याची भाजी कशी तयार करायची? प्रोटीन, फायबर आणि लोहाने भरपूर रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.