दैनंदिन आयुष्यातील 'या' चुकीच्या सवयी उच्च रक्तदाब वाढण्यासाठी ठरतात कारणीभूत
चुकीची जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतात. शरीरात उच्च रक्तदाब वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. जास्त उन्हात काम केल्यानंतर किंवा एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस घेतल्यानंतर उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू लागते. मात्र अनेक लोक शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देत नाहीत. असे केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित गंभीर आजार उद्भवू लागतात. उच्च रक्तदाबाची लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर चुकूनही दुर्लक्ष करू नये.(फोटो सौजन्य – iStock)
उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर ही एक अशी समस्या आहे जी वेगाने पसरत चालली आहे. वाढलेल्या रक्तदाबामुळे स्ट्रोक, हृदयरोग आणि मूत्रपिंड निकामी होणे असे अनेक आजार होऊ शकतात. म्हणून, उच्च रक्तदाबाची समस्या टाळणे महत्वाचे आहे. सामान्यतः लोकांना असे वाटत असते की जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो आणि तो नियंत्रित करण्यासाठी ते मिठाचे सेवन कमी करतात. मात्र रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ इतकेच करणे पुरेसे नाही. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, इतर काही सवयी सुधारणे देखील आवश्यक आहे. त्या सवयी नेमक्या कोणत्या याविषयी आज आपण जाणून घेऊया.
आजच्या धावपळीच्या लाइफस्टाईलमध्ये बहुतेक लोक तासन्तास एकाच ठिकाणी बसून काम करतात. शारीरिक हालचालींचा अभाव लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबाचा धोका वाढवतो. नियमित व्यायामाचा अभाव रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी करतो, ज्यामुळे रक्ताभिसरणातील दाब वाढतो. परिणामी हाय ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होते. यामुळे दररोज किमान ३० मिनिटे जलद चालणे, योगा किंवा एरोबिक्स करा. जास्त वेळ बसणे टाळा आणि दर तासाला ५ मिनिटांचा ब्रेक घ्या.
शरीरात वाढलेला मानसिक तणाव आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. तणाव वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर उच्च रक्तदाब किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी तणाव कमी करणे आवश्यक आहे. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी नियमित व्यायाम करणे, प्राणायाम इत्यादी गोष्टी आवश्यक आहेत.
शरीरात झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. अपचन, त्वचेची गुणवत्ता खराब होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. ८ तासांची शांत झोप घेतल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होऊन आरोग्य सुधारते. झोपेचा अभाव शरीराचा ताण वाढवतो आणि हार्मोनल असंतुलन निर्माण करतो, ज्यामुळे रक्तदाबावर परिणाम होतो. यामुळे दररोज ७-८ तासांची चांगली झोप घ्या. झोपण्यापूर्वी एक तासआधी मोबाईल आणि टीव्ही वापरू नका.
सगळ्यांचं दैनंदिन आहारात सतत बाहेरचे तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याची सवय असते. पण सतत या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते आणि आरोग्याला हानीपोहचते . मिठाव्यतिरिक्त, प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये साखर, ट्रान्स फॅट्स आणि प्रिझर्वेटिव्ह असतात, जे वजन वाढवतात आणि कोलेस्टेरॉलवर परिणाम करून रक्तदाब वाढवतात.