टॉयलेटमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त बसल्यास वाढू शकतो 'या' गंभीर आजारांचा धोका
निरोगी आणि आनंदी दिनचर्येसाठी सकाळी उठल्यानंतर टॉयलेटला जाणे अतिशय महत्वाचे आहे. शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ पोटातून आणि आतड्यांमधून बाहेर पडून गेल्यानंतर शरीर स्वच्छ होते. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. मात्र काहींना सकाळी उठल्यानंतर टॉयलेटमध्ये गेल्यानंतर १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. पोट स्वच्छ न झाल्यामुळे अनेक लोक बराच वेळ टॉयलेटमध्ये बसून राहतात. याशिवाय सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ झाल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य कायम निरोगी राहते. याशिवाय काहींना टॉयलेटमध्ये गेल्यानंतर मोबाईल पाहण्याची सवय असते, मात्र ही चुकीची सवय शरीराचे नुकसान करू शकते.(फोटो सौजन्य – iStock)
दीर्घकाळ टॉयलेटमध्ये बसून राहिल्यास शरीरात अनेक नकारात्मक बदल दिसून येतात.या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसून राहिल्यास पचनसंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. याशिवाय शरीराचे मोठे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अधिक काळ टॉयलेटमध्ये बसून राहिल्यास आरोग्यासंबंधित कोणत्या आजारांचा धोका वाढतो, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
१५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसून राहिल्यास मूळव्याधीची समस्या उद्भवू शकते. मूळव्याधीची समस्या उद्भवल्यानंतर बरीच लोक दुर्लक्ष करतात. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. मूळव्याध झाल्यानंतर गुदद्वारावर आणि आजूबाजूच्या रक्तवाहिन्यांवर तणाव येण्याची शक्यता असते. यामुळे सूज येऊन मूळव्याधीची समस्या उद्भवते. मूळव्याध तयार झाल्यानंतर ओटीपोटात वेदना होण्यास सुरुवात होते. याशिवाय ओटीपोटाचा रक्तप्रवाह मंदावतो. त्यामुळे मूळव्याधीची समस्या उद्भवल्यास योग्य ते औषध उपचार करावे.
टॉयलेटमध्ये गेल्यानंतर जास्त वेळ मोबाईल पाहत बसल्यामुळे बॅक्टेरियांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. घरातील किंवा आजूबाजूच्या परिसरापेक्षा टॉयलेटमध्ये जास्त बॅक्टरीया असतात. त्यामुळे या बॅक्टरीयेचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. टॉयलेटमध्ये असलेले मायक्रोब्स हवेतून फोनमध्ये जातात. ज्यामुळे जेवणताना किंवा इतर वेळी हे बॅक्टरीया शरीरात जाण्याची जास्त शक्यता असते.
टॉयलेटमध्ये अधिक वेळ बसून राहिल्यामुळे शरीराइक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यसुद्धा बिघडून जाते. जास्त वेळ मोबाईल पाहत बसल्यामुळे किंवा व्हिडिओ पाहत बसल्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. यामुळे शरीरातील वेळेचा आणि ऊर्जेचा दुरुपयोग होतो. त्यामुळे टॉयलेटमध्ये जास्त वेळ काढू नये. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जात नसल्यास घरगुती उपाय करून या समस्येपासून आराम मिळवण्याचा प्रयत्न करावा.