पांढरे केस काळे करण्यासाठी 'हा' घरगुती उपाय ठरेल प्रभावी
हल्ली तरुण वयातच केस पांढरे होण्याची समस्या महिलांसह पुरुषांमध्ये दिसून येत आहे. जीवनशैलीत होणारा बदल, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, हार्मोन्सचे असंतुलन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. कमी वयात केस पांढरे झाल्यानंतर मुली बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर डाय, हेअर कलर आणि केमिकल ट्रीटमेंट करून घेतात. यामुळे काहीकाळ केस अतिशय सुंदर आणि चमकदार वाटतात. मात्र कालांतराने पुन्हा एकदा निस्तेज आणि पांढरे होऊन जातात. हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम केसांवर दिसू लागल्यानंतर केसांच्या मुळांना हानी पोहचते. त्यामुळे केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे किंवा केस अचानक पांढरे होणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात.(फोटो सौजन्य – istock)
केस अचानक पांढरे होण्यामागे अनेक कारण आहेत. काहीवेळा आनुवंशिकतेमुळे सुद्धा केस पांढरे होतात. केसांवर केलेला आर्टिफिशियल काळा रंग काही दिवसांनंतर उडून जातो, ज्यामुळे केस पुन्हा एकदा पांढरे होतात. बाजारात उपलब्ध असलेल्या हानिकारक हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. घरगुती उपाय केल्यामुळे केसांवर नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि केस सुंदर होतात. घरगुती उपाय केवळ केस पांढरेच नाहीतर केसांची गुणवत्ता आणि वाढीसाठी प्रभावी ठरतात.
हल्ली अकाली केस पांढरे होण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. केस पांढरे झाल्यानंतर ते काळे करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करून हेअर ऑइल बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हेअर ऑइल बनवण्यासाठी आवळा, कडीपत्ता आणि भृंगराज या औषधी वनस्पतींचा वापर करावा.
आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात वाटीभर तेल घेऊन त्यात सुकलेल्या आवळ्याचे तुकडे, कढीपत्ता, भृंगराज पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण मंद आचेवर शिजवून घ्या. कढीपत्ता आणि आवळा काळा होईपर्यंत तेल गरम करून घ्या. तेल व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करून थंड करून घ्या. थंड तेल गाळून बाटलीमध्ये भरून ठेवा. आठवड्यातून तीन वेळा तयार केलेले तेल केसांच्या मुळांना लावून रात्रभर तसेच ठेवा. याशिवाय तेल लावल्यानंतर केसांना हलकासा मसाज करून घ्या. ज्यामुळे केसांचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. सकाळी उठल्यानंतर केस शाम्पुचा वापर करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. जा उपाय महिनाभर नियमित केल्यास केसांच्या मुळांना पोषण मिळेल आणि केस सुंदर होतील.