(फोटो सौजन्य: istock)
केसगळती ही महिलांना सतावणारी एक सामान्य समस्या आहे. सततच्या केसगळतीमुळे केसांचे आरोग्य खराब होऊ लागतात आणि हळूहळू ते निर्जीव होऊ लागतात. आता केसगळती थांबवण्यासाठी आपण बाजारातील वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचा वापर करतो खऱा पण यात अनेक रासायनिक घटक मिसळलेले असतात, ज्यामुळे आपले केस आणखीन खराब होण्याची शक्यता असते. अशात नको त्या रासायनिक उत्पादनांवर पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही घरीच यावर एक सोपा, कमी खर्चिक आणि घरगुती उपाय करु शकता. चला तर मग हा उपाय काय आहे आणि याचा वापर कसा करावा ते सविस्तर जाणून घेऊया.
आयुर्वेदिक उपाय फायदेशीर ठरतील
आयुर्वेदामध्ये सर्व समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे. त्वचेपासून ते केसांपर्यंत आपल्या प्रत्येक समस्येसाठी आपण आयुर्वेदिक उपायांचा वापर करु शकतो. आज आपण आयुर्वेदित डाॅक्टर शोभना यांनी सुचवलेला एक सोपा पण केसगळती थांबवण्यासाठी प्रभावी ठरणारा उपाय जाणून घेणार आहोत. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी हा उपाय शेअर केला आहे.
साहित्य
वापरण्याची पद्धत
फायदे
Navratri Fast: नवरात्रीच्या उपवासात या चुका करणे टाळा! अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
केस गळण्याची सामान्य कारणे?
काहीवेळा केस गळणे हे अनुवांशिक असू शकते, शरीरातील हार्मोनल बदलांमुळे केस गळू शकतात. आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे कमी असल्यास केस गळतात. जास्त तणावामुळेही केस गळण्याची समस्या वाढू शकते.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
जेव्हा केस गळण्याची समस्या सामान्यपेक्षा जास्त असते किंवा तुम्हाला केस गळण्याची चिंता वाटत असेल, तेव्हा त्वचेच्या डॉक्टरांचा (dermatologist) सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.