Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चविष्ट सारण अन् कुरकुरीत ब्रेड… यंदाच्या पावसाळ्यात ‘ब्रेड पकोडा’ बनवून खाल्ला की नाही? सोपी रेसिपी नोट करा

Bread Pakora Recipe : पावसाच्या थंड वातावरणात कुरकुरीत आणि गरमा गरम पदार्थ खायला फार छान लागतात आणि कुटूंबाला खुशही करतात. अजूनही घरी बनवलं नसेल तर आजच रेसिपी फॉलो करून घरी बनवा चविष्ट ब्रेड पकोडा!

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 29, 2025 | 02:45 PM
चविष्ट सारण अन् कुरकुरीत ब्रेड... यंदाच्या पावसाळ्यात 'ब्रेड पकोडा' बनवून खाल्ला की नाही? सोपी रेसिपी नोट करा

चविष्ट सारण अन् कुरकुरीत ब्रेड... यंदाच्या पावसाळ्यात 'ब्रेड पकोडा' बनवून खाल्ला की नाही? सोपी रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:

पावसाळ्यात किंवा थंड हवामानात गरमागरम पकोडे खाण्याची मजाच काही और असते. अशा वेळी ब्रेड पकोडा हा एक अतिशय सोपा, झटपट आणि चविष्ट पर्याय आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतमध्ये चविष्ट सारण भरून तयार केलेला ब्रेड पकोडा अनेकांच्या आवडीचा आहे. चहा बरोबर खाण्यासाठी हा एक उत्तम नाश्ता आहे.

सकाळचा नाश्ता जरा हेल्दी होऊन जाऊद्यात; घरी बनवा पौष्टिक पण चवदार असा कुरकुरीत रागी डोसा

सकाळी अथवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा पदार्थ बनवून याचा आस्वाद घेऊ शकता. बाजारातही हा चविष्ट विकत मिळतो पण पावसाळ्यात बाहेरचे अन्नपदार्थ आपल्या आरोग्यासाठी धोका निर्माण करू शकतात अशात घरीच तुम्ही सोप्या पद्धतीचे हा चविष्ट नाश्ता बनवून सर्वांना खुश करू शकता. याची चव अप्रतिम लागते आणि पावसाळ्यात तर याला खाण्याची मजा आणखीनच द्विगुणित होते. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

पकोड्यासाठी:

  • ब्रेड स्लाइस – 6 (पांढरे किंवा ब्राउन ब्रेड)
  • बटाटे – 3 मध्यम (उकडून कुस्करलेले)
  • हिरव्या मिरच्या – 2 (बारीक चिरून)
  • आले – 1/2 टीस्पून (किसलेले किंवा पेस्ट)
  • हळद – 1/4 टीस्पून
  • लाल तिखट – 1/2 टीस्पून
  • जिरे – 1/2 टीस्पून
  • आमचूर पावडर / लिंबू रस – 1 टीस्पून
  • कोथिंबीर – 2 टेबलस्पून (बारीक चिरलेली)
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – शेकण्यासाठी
पीठासाठी:
  • बेसन – 1 कप
  • हळद – 1/4 टीस्पून
  • तिखट – 1/2 टीस्पून
  • हिंग – चिमूटभर
  • बेकिंग सोडा – 1 चिमूट (ऐच्छिक, कुरकुरीत होण्यासाठी)
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार
श्रावणातील उपवासाच्या दिवशी घरी बनवा कुरकुरीत रताळ्याचे काप, घरातील सगळ्यांचं आवडेल पदार्थ

कृती:

  • ब्रेड पकोडा तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करा.
  • त्यात जिरे, मिरच्या, आले घालून परता. नंतर त्यात हळद, तिखट, कुस्करलेले बटाटे, मीठ, आमचूर पावडर (किंवा लिंबू रस) आणि कोथिंबीर घालून सर्व एकत्र करा. 2-3 मिनिटे परतून गॅस बंद करा.
  • ब्रेड स्लाइसला त्रिकोण आकारात कापून घ्या. एका स्लाइसवर बटाट्याचं सारण लावा आणि त्यावर दुसरी स्लाइस ठेवून हलक्या हाताने दाबा.
  • एका भांड्यात बेसन, हळद, तिखट, हिंग, मीठ, थोडंसं बेकिंग सोडा आणि पाणी घालून मध्यमसर घट्ट पीठ बनवा. गाठी नकोत.
  • कढईत तेल गरम करा. तयार ब्रेड स्लाइस बेसनाच्या पिठात बुडवून गरम तेलात तळा. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत तळून घ्या.
  • गरमागरम ब्रेड पकोडे हिरवी चटणी, चिंच-गुळाची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
  • ब्रेड थोडा जुना असेल तर पकोडे कुरकुरीत होतात.
  • तुम्ही ब्रेडमध्ये चीज, स्वीट कॉर्न किंवा पनीर भरून यात एक वेगळी स्टफिंग देखील भरू शकता.
  • शक्यतो हा ब्रेड पकोडा गरमा गरमच खावा, गरम याची चव छान लागते.

Web Title: This monsoon make tasty and crispy everyons favourite bread pakora at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी
1

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी
2

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
3

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा
4

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.