चेहऱ्यावर जमा झालेल्या मृत पेशी कायमच्या नष्ट करण्यासाठी पपईचा 'हा' मास्क ठरेल प्रभावी
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळे खायला खूप जास्त आवडतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फळ म्हणजे पपई. पपईचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. मासिक पाळी लवकर येण्यासाठी पपई खाल्ला जातो. तसेच पपई खाल्यामुळे शरीरात उष्णता वाढत नाही. बिघडलेली पचनशक्ती सुधारण्यासाठी पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय बद्धकोष्ठता, अपचन किंवा पचनाच्या कोणत्याही समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पपईचे सेवन करावे. पपईमध्ये पपेन नावाचे एंझाइम आढळून येते, ज्यामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. याशिवाय पपईमध्ये विटामिन सी, ए, ई इत्यादी अनेक घटक आढळून येतात. अँटी ऑक्सिडंट्स आणि बीटा कॅरोटीन गुणधर्मांनी समृद्ध असलेली पपई पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते.(फोटो सौजन्य – istock)
रोज धुवाल तर केस स्वच्छ नाही, पूर्णपणे सफाचट होतील! मग काय करावे? जाणून घ्या
वर्षाच्या बाराही महिने वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. चेहऱ्यावर सतत घाम आल्यामुळे त्वचेवर मृत पेशी जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे चेहरा अतिशय काळवंडलेला आणि निस्तेज वाटू लागतो. यामुळे त्वचेची गुणवत्ता सुद्धा खराब होऊन जाते. चेहऱ्यावर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचा खूप जास्त रुक्ष आणि निस्तेज होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पपईचा फेसमास्क बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने तयार केलेला फेसमास्क त्वचेवरील मृत पेशी कमी करण्यासाठी मदत करतो.
पपईचा फेसमास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, पपईचे बारीक बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात पपई टाकून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात मध मिक्स करा. तयार केलेला मास्क संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळा तसाच ठेवून द्या. त्यानंतर त्वचा पाण्याचे स्वच्छ करून घ्या. पंधरा ते वीस मिनिट ठेवल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय केल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आणि त्वचा उजळदार दिसेल. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा हा फेसमास्क तुम्ही त्वचेवर लावू शकता.
पपईमध्ये असलेले गुणधर्म त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारतात. याशिवाय चेहरा उजळदार करतात. यामध्ये असलेल्या अँटी ऑक्सिडंट्स गुणधर्मांमुळे त्वचेला येणारी सूज, दाह व मुक्त रॅडिकल्सचे नुकसान कमी होऊन त्वचा कायमच निरोगी राहते. पपईमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेवरील पिंपल्स कमी होतात आणि त्वचा उजळदार होते. त्वचेची गुणवत्ता सुधरण्यासाठी हानिकारक केमिकलचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी.