फोटो सौजन्य - Social Media
घनदाट, मऊसूत, लांबसडक केस कोणाला आवडत नाहीत? पण असे केस रोज शॅम्पू केल्याने मिळतातच असं नाही. खरं तर शॅम्पूमधील केमिकल्समुळे केसांची हानी होऊ शकते. मग नेमकं किती दिवसांनी केस धुवावेत आणि कशी काळजी घ्यावी, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
रोज केस धुणं योग्य आहे का?
रोज शॅम्पू केल्याने केस स्वच्छ वाटतात, पण त्यातील ओलावा निघून जाऊन केस कोरडे, निस्तेज आणि तुटके होतात. विशेषतः कुरळे केस असणाऱ्यांनी रोज केस धुणं टाळावं, कारण त्यात ड्रायनेस लवकर येतो. मात्र, ऑयली केस असणारे लोक एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी केस धुऊ शकतात.
केसांच्या प्रकारानुसार शॅम्पूची वेळ
जास्त शॅम्पूमुळे होणारे दुष्परिणाम
ड्राय शॅम्पू : हे स्काल्पवरील अतिरिक्त तेल आणि धूळ शोषून घेतं. पण हे नियमित शॅम्पूचा पर्याय नाही.
कमी स्टाइलिंग प्रॉडक्ट्स : जेल, हेअरस्प्रे किंवा सिरम यांचा जास्त वापर टाळावा. हे स्काल्पवर जमा होऊन केस डॅमेज करतात.
शॅम्पू पूर्ण केसांवर नव्हे, तर मुळांवर शॅम्पू लावा. त्यामुळे स्काल्प स्वच्छ राहील आणि नैसर्गिक ओलावा जपला जाईल. थोडक्यात सांगायचं तर, केस रोज धुणं टाळा. केसांच्या प्रकारानुसार योग्य अंतर ठेऊन शॅम्पू करा, नैसर्गिक तेलं व ओलावा जपून ठेवा. तेव्हाच तुमचे केस खरंच निरोगी आणि चमकदार दिसतील.