
गारठ्यामुळे थ्रोट इन्फेक्शनचा वाढला जोर, 'या' आजारांचे आढळून येत आहेत सर्वाधिक रुग्ण
वाढत्या थंडीमुळे कोणत्या आजारांच्या रुग्ण संख्येत वाढ?
थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी उपाय?
अमरावती: दोन दिवसांपासून पुन्हा नागरिकांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्वचारोगासह दम्याचे रुग्ण वाढले आहेत. हवेचा वेग कमी-अधिक होत असल्याने जाणवणाऱ्या गारठ्यामुळे थ्रोट इन्फेक्शन, सदों, खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य रुग्णालयाच्या ओडीपी सह प्रायव्हेट दवाखान्यातसुद्धा रुग्णांची गर्दी वाढली आहे. शुक्रवारी तब्बल ११००च्या वर रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये काही दम्याच्या व सांधेदुखीच्या रुग्णांना अॅडमिटही करावे लागले आहे. वयोवृद्धांचा सर्वाधिक समावेश आहे. (फोटो सौजन्य – istock)
तुमची झोप हिरावून घेत आहे डार्क चॉकलेटचे सेवन, डॉक्टरांनी केलं सावध; यात नक्की असतं तरी काय?
संपूर्ण देशभरात वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे वेगवेगळ्या साथीच्या आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. साथीचे आजार झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत आणि नाजूक होऊन जाते. शरीरात कायमच थकवा आणि अशक्तपणा वाढून आरोग्य बिघडते. कधी ऊन तर कधी थंडी पडत असल्यामुळे साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. यामध्ये सर्दी, खोकला, घशातील इन्फेक्शन आणि इतर वेगवेगळ्या आजारांचे रुग्ण वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. थंडीत आरोग्याची खूप जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.
डिसेंबरच्या सुरुवातीपासून थंडीचा जोर वाढल्याने हिवाळ्याचा ज्वर वाढत आहे. आठ दिवसांपूर्वी वातावरणातील थंडी गायब झाली होती. यामुळे स्वेटरसह कानटोपी घालण्याचे प्रमाण कमी झाले होते. दोन-तीन दिवसांपासून पुन्हा हवेतील गारठा वाढला आहे. बोचरी थंडी जाणवत वातावरणात बदल झाला आहे. लहान मुलांना सदी, खोकल्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच वयोवृद्ध नागरिकांत गुडघेदुखीसह दम्याचे प्रमाण अधिक असल्याने अनेकांना दाखल करून उपचार करावे लागतात. रुग्णालयात उपचार घेण्याचे प्रमाण ऋतू बदल होत असल्याने वाढले आहे, असे डॉ. अमोल वानखडे म्हणाले.
रात्री हवेमुळे थंडीचे प्रमाण अधिक जाणवत आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीलाच थंडीचे प्रमाण अधिक जाणवत असल्याने आगामी दोन महिन्यांत थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. थंडीच्या कडाक्यामुळे सांधेदुखीसह दम्याचे रुग्ण वाढत आहे. यामुळे सामान्य रुग्णालयात गर्दी वाढल्याचे दिसत आहे. यामुळे चार दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात रुग्णांनी गर्दी केली होती. थंडीमुळे त्वचारोगाचे रुग्ण अधिक आहेत. अचानक थंडीची लाट ओढवल्याने वातावरणात बदल रुग्णालयात झाला असून, रात्रीसह दिवसाचेही तापमान कमी झाले आहे. किमान तापमान १२ ते १४ अंश तर कमाल २७ ते २९ अंशावर आहे. तापमानाचा पारा कमी नसला तरी बोचरी थंडी अधिक आहे. जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक ग्रामीण भागातील रुग्ण असून, घसा दुखणे, सदर्दी, खोकल्याचे रुग्ण आहेत. आगामी काही दिवसांत थंडीचे प्रमाण वाढून कमाल तापमानाचा पारा २५ इतका झाला आहे.
बालरोग विभाग १२०, कान नाक घसा १५०, डोळे हाड २००, सर्जिकल ३६ मधुमेह ३६० तर किमान तापमान १० ते ११ अंशावर जाण्याची शक्यता आहे. आगामी काळात थंडी वाढल्यास विविध साथीच्या आजारासह त्वचारोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. लहान मुलांत सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढले जिल्हा रुग्णालयातील स्त्री, पुरुष वॉर्डासह बाल रुग्ण विभागात जवळपास १५० रुग्ण दाखल आहेत. यामध्ये सर्वाधिक सर्दी, खोकला, थंडी, तापाचे रुग्ण आहेत.