वाढत्या वयात चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी चेहऱ्यावर नियमित लावा होममेड फेसपॅक
वय वाढल्यानंतर त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांकडे अनेकदा महिला दुर्लक्ष करतात. मात्र त्वचेसंबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करणे त्वचेसाठी घातक ठरू शकते. वाढत्या वयात त्वचेमध्ये अनेक बदल दिसून येतात. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, वांग, त्वचा अतिशय कोरडी पडणे किंवा त्वचेची गुणवत्ता खराब होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. दैनंदिन आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात तेलकट आणि तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे पिंपल्स, मुरूम किंवा फोड येऊ लागतात. अशावेळी अनेक महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात, तर काही महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर करता.(फोटो सौजन्य – iStock)
त्वचेला सूट न होणाऱ्या प्रॉडक्टचा वापर त्वचेसाठी केल्यास चेहरा खराब होण्याची जास्त शक्यता असते. वयाच्या तिशीमध्ये अनेक महिला वृद्ध दिसू लागतात. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, वांग इत्यादींमुळे त्वचा अतिशय खराब दिसू लागते. याशिवाय त्वचा सैल झाल्यानंतर चेहऱ्यावर वेगवेगळे प्रॉडक्ट लावले जातात. मात्र यामुळे त्वचेमध्ये फारसा बदल दिसून येत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सैल झाली त्वचा पुन्हा तरुण ठेवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करून फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा लावल्यास त्वचा अधिक तरुण राहील.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काकडीचे रोज सेवन करावे. काकडीमध्ये भरपूर पाणी असते, ज्यामुळे त्वचा अधिक हायड्रेट आणि तरुण राहते. काकडी फेसपॅक तयार करण्यासाठी सर्वप्रथम, काकडीची पेस्ट बनवून त्यात दही टाकून पेस्ट तयार करा. तयार करून घेतलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर 15 मिनिटं लावून ठेवा. त्वचा थंड झाल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करून घ्या.हा फेसपॅक तुम्ही नियमित सुद्धा वापरू शकता. काकडी फेसपॅकचा वापर त्वचेसाठी अतिशय प्रभावी ठरेल.
बेसनमध्ये असलेले गुणधर्म त्वचेवरील डाग आणि मुरुमांच्या समस्येपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करतात. याशिवाय त्वचेवर बेसन लावल्यामुळे त्वचा अधिक उजळदार आणि सुंदर दिसते. यासाठी वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात दही आणि गुलाब पाणी टाकून पातळ पेस्ट करून घ्या. पेस्ट तयार करून झाल्यानंतर संपूर्ण मिश्रण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा घट्ट होईल आणि त्वचा अधिककाळ तरुण दिसेल. फेसपॅक 15 मिनिटं ठेवल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे तुमची त्वचा उजळदार आणि सुंदर दिसेल.