
हिवाळ्यात वाढलेला सर्दी खोकला कमी करण्यासाठी घरीच तयार करा हर्बल टी!
थंडीच्या दिवसांमध्ये सतत सर्दी खोकला का होतो?
सर्दी खोकला झाल्यानंतर कोणते उपाय करावेत?
आयुर्वेदिक काढा बनवण्याची कृती?
संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये हातपाय आखडणे, सर्दी, खोकला, स्नायूंमध्ये वेदना होणे, हातापायांना मुंग्या येणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात. थंड वातावरणामुळे काहींना सतत सर्दी, खोकला होतो. सर्दी झाल्यानंतर नाकातून पाणी येणे, नाक झोंबणे, नाकात वेदना यासंख्या समस्या वाढून आरोग्य बिघडते. सर्दी खोकला होणे हे अतिशय सामान्य मानले जाते. पण थंडीच्या दिवसांमध्ये तुम्हाला जर वारंवार सर्दी किंवा खोकला येत असेल तर दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. सतत होणाऱ्या सर्दीला कंटाळून डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घेतली जातात. पण तरीसुद्धा कोणताच परिणाम दिसून येत नाही. अशावेळी आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करावे. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या काढ्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाईल आणि कफ मोकळा होईल. चला तर जाणून घेऊया आयुर्वेदिक हर्बल टी बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)
Dolo चा ओव्हरडोस लिव्हरसाठी ठरेल अतिशय घातक! चुकूनही करू नका सेवन, शरीरात दिसतील ‘ही’ गंभीर लक्षणे
सकाळी आणि संध्याकाळी हर्बल टी चे सेवन केल्यास दोन दिवसांमध्ये फुफ्फुसांमध्ये साचलेला कफ आणि घशात वाढलेली खवखव कमी होईल. हर्बल टी चे सेवन केल्यामुळे जुनाट सर्दी, खोकला सुद्धा लवकर बरा होईल. सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाला चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण चहा कॉफीचे सेवन करण्याऐवजी आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध असलेल्या हर्बल टी चे सेवन करावे. हर्बल टी च्या सेवनामुळे घशात वाढलेले जंतू नष्ट होऊन जातात. याशिवाय रात्रीच्या वेळी येणारा खोकला सुद्धा कमी होऊन जातो. चला तर जाणून घेऊया हर्बल टी बनवण्याची सोपी रेसिपी.
सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर पाण्यात ज्येष्ठमध पावडर आणि दालचिनी पावडर घालून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात ७ ते ८ तुळशीची पाने घालून उकळी काढून घ्या. त्यानंतर त्यात केशर काड्या घाला. तयार केलेल्या काढ्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून काढा गाळून घ्या. तयार केलेला काढा रात्री झोपण्याआधी नियमित प्यायल्यास आठवडाभरात सर्दी, खोकला कमी होऊन कफ बाहेर पडून जाईल. याशिवाय काढा बनवताना तुम्ही त्यात आल्याचा रस, काळीमिरी किंवा लवंग सुद्धा टाकू शकता. वारंवार होणाऱ्या सर्दी खोकल्यापासून आराम मिळत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावेत.
महिनाभर साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरावर दिसून येतात ‘हे’ सकारात्मक परिणाम, त्वचा दिसेल चमकदार
सर्दी खोकला झाल्यानंतर जेष्ठमध पावडरचे सेवन केले जाते. यामुळे खोकल्यापासून आराम मिळतो. नाकातून सतत वाहणारे पाणी, घशात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी दालचिनी प्रभावी ठरते. मागील बऱ्याच वर्षांपासून आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा वापर शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी केला जात आहे.