Dolo चा ओव्हरडोस लिव्हरसाठी ठरेल अतिशय घातक! चुकूनही करू नका सेवन, शरीरात दिसतील 'ही' गंभीर लक्षणे
डोलोच्या गोळीचे शरीरावर दिसून येणारे गंभीर परिणाम?
पेनकिलरच्या गोळ्या खाल्ल्यामुळे लिव्हरवर कोणते परिणाम होतात?
डोलोची गोळी आरोग्यासाठी का घातक आहे?
वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सर्दी खोकला, ताप, जुलाब, उलट्या किंवा आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. शरीरात आजाराची लक्षणे दिसू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी मेडिकलमधील गोळी आणून खाल्ली जाते. पण मेडिकलमधील गोळ्यांचे वारंवार सेवन केल्यामुळे किडनी आणि लिव्हर खराब होते. मेडिकलमधील गोळ्या काहीवेळा एक्सस्परी झालेल्या असतात, तर काहीवेळा चुकीच्या गोळ्या सुद्धा दिल्या जातात. त्यामुळे वारंवार ताप, सर्दी, खोकला होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – istock)
महिनाभर साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरावर दिसून येतात ‘हे’ सकारात्मक परिणाम, त्वचा दिसेल चमकदार
थोडी कणकण आहे, डोकं दुखतंय किंवा शरीरात कुठेही वेदना होत असेल तर आपल्या भारतात डॉक्टरांना न विचारता एक गोळी डोळे झाकून सर्वात जास्त घेतो, ती म्हणजे डोलो-६५०. अलीकडेच हो गोळी सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. कारणही तसंच आहे. अमेरिकेमधील गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट व हेल्थ एज्युकेटर डॉ. पलानीअप्पन मणिकम यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी लिहिलंय, “भारतीय डोलो ६५० कॅडबरी जेम्ससारखी खातात.” त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि लोकांच्या औषधं वापरण्याच्या सवयींवर पुन्हा चर्चा सुरू झाली.
डॉक्टरांच्या मते, ही गोळी ताप आणि इतर वेदनांवर परिणामकारक असली तरी पॅरासिटामोल जास्त प्रमाणात घेतलं किंवा गरज नसताना सुद्धा घेतलं तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. युनायटेड किंगडमच्या नॅशनल हेल्थ सर्विस (एनएचएस) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रौढ व्यक्तींनी एकावेळी ५०० एमजीच्या एका किंवा दोन गोळ्या घेतल्या पाहिजेत. इतकंच नाही तर २४ तासांत ८ पेक्षा जास्त गोळ्या घेतल्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात औषधं घेऊ नका.
साईड इफेक्ट्स आणि लिव्हरवर परिणाम पॅरासिटामोल योग्य प्रमाणात नाही घेतला आणि ओव्हरडोस झाला तर त्याचे शरीरावर साइड इफेक्ट्स होतात. त्वचेवर पुरळ येणे, अंगावर खाज सुटणे, घशात सूज येणे, श्वास घेताना त्रास होणे, अस्वस्थ वाटणे अशी लक्षणं दिसून येतात. आणि जर जास्त कालावधीसाठी तुम्ही अति सेवन केलं तर लिव्हरवर गंभीर परिणाम होऊ शकतात.
अनेकजण हलगर्जीपणा करत गोळ्यामध्ये असलेले कंटेंट वाचत नाहीत. पण त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. म्हणून लक्षात ठेवा की पॅरासिटामोल असलेल्या इतर औषधांसोबत पुन्हा पॅरासिटामोल घेऊ नका. असं केलं तर अनवधानाने ओव्हरडोस होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे हलकाच ताप असेल तर आधी विश्रांती घ्या, पुरेस आहार घ्या.
Ans: यकृत इतके खराब होते की ते योग्यरित्या कार्य करू शकत नाही. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करण्याची, पचनास मदत करण्याची आणि ऊर्जा निर्माण करण्याची त्याची क्षमता कमी होते.
Ans: थकवा आणि अशक्तपणा, ओटीपोटात सूज (जलोदर) आणि वेदना
Ans: दीर्घकाळ जास्त प्रमाणात दारू पिल्याने लिव्हरच्या पेशी नष्ट होतात आणि सिरोसिस होतो.






