
चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी संत्र्याच्या सालीचा 'या' पद्धतीने करा वापर
हल्ली सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी महागड्या स्किन ट्रीटमेंट तर कधी फेशिअल, क्लीनअप इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. वरून त्वचेची खूप जास्त काळजी घेतली जाते.यामुळे फारसा फरक दिसून येत नाही. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, पोषक घटकांचा अभाव आणि वारंवार बिघडलेल्या पचनक्रियेचा परिणाम आरोग्यासोबतच चेहऱ्यावर सुद्धा लगेच दिसू लागतो. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, ऍक्ने, फोड आणि मुरुमांचे डाग घालवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. पण अपचन, धूळ, माती आणि प्रदूषणामुळे त्वचा खूप जास्त निस्तेज आणि टॅन होऊन जाते. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी खूप जास्त पैसे खर्च केले जातात. पण फारसा बदल दिसून येत नाही. अशावेळी आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय प्रभावी ठरतात. (फोटो सौजन्य – istock)
आजीबाईच्या बटव्यात अनेक वेगवेगळे घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत. आरोग्य, त्वचा आणि केसांच्या वेगवेगळ्या समस्यांवर कोणते आयुर्वेदिक उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला संत्र्याच्या सालींचा वापर त्वचेसाठी कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. संत्र्याच्या सालीमध्ये असलेले गुणकारी घटक त्वचेवर आलेले डाग कमी करण्यास मदत करतात. याशिवाय त्वचा आतून सुधारतात. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी संत्र्याच्या सालीचा वापर करावा. संत्र्याची साल प्रभावी ठरेल.
संत्र्याच्या सालीपासून बनवलेले उटणं, लेप किंवा फेसपॅक तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे काळे डाग आणि मुरूम कमी होण्यास मदत होईल. रोजच्या धावपळीमुळे महिला कायमच बाजारातील केमिकल युक्त स्किन केअर प्रॉडक्ट वापरण्यावर जास्त भर देतात. पण घरगुती उपाय केले जात नाहीत. असे न करता घरगुती आणि आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले उपाय करावेत.
संत्र्याच्या सालीचे सीरम बनवण्यासाठी सर्वप्रथम, संत्री, लिंबू आणि पपईची साल पाण्यात भिजत ठेवावी. थंड पाण्यात १ तास भिजवत ठेवल्यामुळे सालीमधील अर्क पाण्यात उतरेल. पाणी घट्ट झाल्यानंतर चाळणीने गाळून घ्या. त्यानंतर त्यात कोरफड जेल, विटामिन ई कँप्सूल, ग्लिसरीन, बदामाचे तेल घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा. संत्र्याच्या सालीपासून बनवलेले सीरम २ आठवड्यांपर्यंत टिकते. सीरम फ्रिजमध्ये ठेवावे. पण सीरमला वास येण्यास सुरुवात झाली तर चेहऱ्यावर लावू नये.
संत्र्याच्या सालीचे सीरम नियमित चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग कमी होण्यासोबतच त्वचा खूप जास्त उजळदार दिसेल. त्वचेमधील कोलेजन वाढल्यामुळे त्वचा मजबूत आणि तरुण राहील. थंडीसह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित सीरम लावावे. सीरम लावल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते.