Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी जावेद हबीबने सांगितलेला हेअर मास्क नक्की करा ट्राय, केस होतील मजबूत

केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर केस गळणे, केस तुटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी जावेद हबीबने सांगितलेला हेअर मास्क नक्की ट्राय करून पहा. यामुळे तुमचे केस मजबूत होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 04, 2025 | 01:58 PM
खोबऱ्याचे तेल केसांना लावण्याचे फायदे:

खोबऱ्याचे तेल केसांना लावण्याचे फायदे:

Follow Us
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणातील आद्रतेचा परिणाम त्वचेसोबत केसांवर सुद्धा दिसून येतो. या दिवसांमध्ये केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे, केस तुटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. केसांना योग्य पोषण न मिळाल्यामुळे केसांसंबधित समस्या उद्भवतात. अशावेळी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रोटीन ट्रीटमेंट करतात. मात्र या प्रोटीन ट्रीटमेंट फारकाळ केसांवर टिकून राहत नाही. त्यामुळे केसांना वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे आवश्यक आहे. केसांच्या वाढीसाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा, कॅल्शियम युक्त पदार्थ इत्यादी पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)

केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांची होईल झपाट्याने वाढ, दिसतील अधिक चमकदार

वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम केसांवर लगेच दिसून येतो. केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर टाळूवर सतत खाज येऊ लागते. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर केस गळतात. याशिवाय टाळू पूर्णपणे रखरखीत होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सेलिब्रिटी हेअर केअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी केसांसंबधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती हेअर मास्क तयार करण्याची सोपी कृती सांगितली आहे. यामुळे तुमच्या टाळूवरील कोंडा कमी होईल आणि केसगळतीच्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होईल. या हेअर मास्कचा वापर केल्यामुळे केस मजबूत राहून कोंडा कमी होतो.

हेअर मास्क तयार करण्याची कृती:

हेअर मास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये आल्याचा रस घेऊन त्यात खोबऱ्याचे तेल मिक्स करा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर केसांचे दोन भाग करून केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत संपूर्ण केसांवर तयार केलेला घरगुती हेअरमास्क लावून केस 10 ते 15 मिनिटं हलक्या हाताने मसाज करून घ्या. मसाज करून झाल्यानंतर काहीवेळ केस तसेच ठेवा. नंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा केल्यास केसांची वाढ निरोगी होईल आणि केसांचे गळणे थांबेल.

घाणीमुळे काळा झालेला कंगवा स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, होईल नव्यासारखा चमकदार

खोबऱ्याचे तेल केसांना लावण्याचे फायदे:

पूर्वीच्या काळापासून खोबऱ्याच्या तेलाचा वापर जेवणासोबतच केसांच्या वाढीसाठी सुद्धा केला जात आहे. खोबऱ्याच्या तेलाने केसांमध्ये मसाज केल्यास टाळूवरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. यामुळे केस तुटणार नाही. आल्यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे केसांना पोषण मिळते आणि केस मजबूत होतात. आल्यामध्ये अ‍ॅंटीफंगल, अ‍ॅंटीबॅक्टेरिअल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे टाळूवरील इन्फेक्शनचा धोका कमी होतो. कोंडा कमी करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात तुम्ही आल्याची पावडर सुद्धा मिक्स करून लावू शकता.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Try javed habibs hair mask to reduce dandruff benefits of aplying coconut oil for hair healthy hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 01:58 PM

Topics:  

  • hair care tips
  • Home Remedies For Dandruff
  • Javed Habib

संबंधित बातम्या

केसांची मूळ कमकुवत झाली आहेत? मग ‘या’ हिरव्या पानांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल आयुर्वेदिक तेल, केस होतील घनदाट
1

केसांची मूळ कमकुवत झाली आहेत? मग ‘या’ हिरव्या पानांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल आयुर्वेदिक तेल, केस होतील घनदाट

‘या’ पद्धतीने केसांवर लावा आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले आवळ्याचे पाणी, केसांच्या वाढीसाठी अस्सल पारंपरिक उपाय
2

‘या’ पद्धतीने केसांवर लावा आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले आवळ्याचे पाणी, केसांच्या वाढीसाठी अस्सल पारंपरिक उपाय

Hair Spa खरंच केसांसाठी फायदेशीर की फक्त पैशांची उधळण; जाणून घ्या
3

Hair Spa खरंच केसांसाठी फायदेशीर की फक्त पैशांची उधळण; जाणून घ्या

केस विंचरल्यानंतर होणारा गुंता पाहून भीती वाटते? मग केसांवर लावा ‘हे’ आयुर्वेदिक तेल, महिनाभरात केस होतील जाडजूड
4

केस विंचरल्यानंतर होणारा गुंता पाहून भीती वाटते? मग केसांवर लावा ‘हे’ आयुर्वेदिक तेल, महिनाभरात केस होतील जाडजूड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.