कंगवा स्वच्छ करण्यासाठी सोप्या टिप्स
सर्वच महिला पुरुष केस विंचरण्यासाठी फणी किंवा कंगव्याचा वापर करतात. कामाला बाहेर जाताना किंवा घरात अस्लेल्यानंतर केस विंचरण्यासाठी कंगव्याचा वापर केला जातो. केस विंचरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कंगवे वापरले जातात. लाकडी, प्लास्टिक किंवा बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारातील कंगवे उपलब्ध झाले आहेत. मात्र नेहमी नेहमी तोच कंगवा वापरल्यामुळे अनेकदा तो खराब होऊन जातो. केसांमधील कोंडा, धूळ, प्रदूषणाचे कण इत्यादी गोष्टी कंगव्यामध्ये तशाच चिटकून राहतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कंगवा स्वच्छ करणे आवश्यक आहे. अन्यथा खराब कंगवा वापरल्यामुळे केस तुटण्याची किंवा केसांमध्ये कोंडा होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
स्किन केअर करताना ‘या’ चुका करणे टाळा, अन्यथा चेहऱ्यावरील पिगमेंटेशन, पिंपल्समुळे त्वचा होईल खराब
दैनंदिन वापरात प्रामुख्याने लाकडी कंगवा वापरावा. ज्यामुळे केस तुटणार नाहीत. नेहमी नेहमी एकाच कंगव्याचे घरातील सर्वच लोक वापर करतात. त्यामुळे तो कंगवा अस्वच्छ होऊन जातो. कंगवा खराब झाल्यानंतर तो पाणी वापरून स्वच्छ केला जातो. मात्र पाणी वापरून स्वच्छ केलेला कंगवा सुकवला नाहीतर त्यात तशीच घाण साचून राहते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घाणीमुळे काळा झालेला कंगवा स्वच्छ करण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत, हे उपाय केल्यामुळे तुमचा कंगवा व्यवस्थित स्वच्छ होईल.
केसांमधील कोंड्यामुळे खराब झालेला कंगवा स्वच्छ करण्यासाठी शॅम्पूचा वापर करावा. शँम्पूचा वापर केल्यामुळे कंगवा स्वच्छ होतो. यासाठी पाण्यामध्ये शॅम्पू मिक्स करून घ्या. त्यानंतर कंगवा शॅम्पूच्या पाण्यात १० मिनिटं तसाच भिजत ठेवा. नंतर ब्रशच्या सहाय्याने घासून व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. नंतर पुन्हा एकदा पाण्याचा वापर करून कंगवा स्वच्छ करा. यापद्धतीने कंगवा स्वच्छ केल्यास तुमचा कंगवा नवीन दिसेल.
बेकिंग सोड्याचा वापर करून कंगवा स्वच्छ केल्यास कंगवा व्यवस्थित स्वच्छ होईल. यासाठी बेकिंग सोड्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर काहीवेळ त्याच्यामध्ये कंगवा टाकून ठेवा. त्यानंतर ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित घासून स्वच्छ करून घ्या. या पद्धतीचा वापर करून तुम्ही तुमचा कंगवा आठवड्यातून दोनदा स्वच्छ करू शकता.
Ice facial म्हणजे काय? जाणून आइस फेशिअल करण्याची पद्धत आणि त्वचेला होणारे अद्भुत फायदे
कमीत कमी वेळात जर तुम्हाला कंगवा स्वच्छ करायचा असेल तर तुम्ही साबणाचा वापर करू शकता. साबणाच्या वापरामुळे कंगवा पुन्हा एकदा नव्यासारखा होईल. यासाठी कंगवा पाण्याने ओला करून घ्या. त्यानंतर ब्रशवर साबण घेऊन कंगवा व्यवस्थित घासून घ्या. यामुळे कंगव्यात अडकलेली घाण सहजपणे निघून येईल.