केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेलात मिक्स करा हे पदार्थ
धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. कामाचा तणाव, दैनंदिन जीवन, कुटुंबिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो.अशावेळी महिलांना आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. केसांच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे केसांची वाढ होत नाही. याशिवाय वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा पारिणाम केसांवर लगेच दिसून येतो. थंडीच्या दिवसांमध्ये केस अधिक कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. केसांच्या वाढीसाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या केमिकल ट्रीटमेंट करून घेतात. मात्र त्याचा फारसा परिणाम केसांवर दिसून येत नाही.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर केसांच्या निरोगी वाढीसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी हेअरमास्क लावणे, वेगवेगळ्या हेअर केअर ट्रीटमेंट, महागडे प्रॉडक्ट इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. मात्र हे सर्व उपाय करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. केसांच्या निरोगी वाढीसाठी केसांना नियमित खोबरेल तेल लावणे आवश्यक आहे. खोबरेल तेलाचा वापर केल्यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेलात कोणते पदार्थ मिक्स करून केसांना लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
केसांच्या वाढीसाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात १ चमचा एरंडेल तेल टाकून मिक्स करून घ्या. एरंडेल तेल मिक्स करून झाल्यानंतर तयार केलेले तेल केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत सगळीकडे व्यवस्थित लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे केसांची मूळ मजबूत होतील. त्यानंतर रात्रभर तेल केसांमध्ये लावून ठेवल्यानंतर सकाळी उठल्यानंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांची वाढ निरोगी होईल आणि केस चमकदार दिसतील. हा तेल तुम्ही आठवड्यातून दोनदा केसांना लावू शकता. यामुळे केसांची वाढ होईल.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
महिनाभर केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय केल्यास केसांची वाढ चांगली होईल. केसांमधील नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. एरंडेल तेलचा वापर केल्यामुळे केस सिल्की आणि घनदाट दिसतील. थंडीच्या दिवसांमध्ये केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी एरंडेल तेल अतिशय प्रभावी आहे.