विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी करून पाहा 'हे' घरगुती उपाय
थंडीच्या दिवसांमध्ये शरीरसंबंधित अनेक समस्या वाढू लागतात. शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होऊन अशक्तपणा जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे थंडीमध्ये आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. निरोगी आरोग्य जगण्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयव महत्वाचा आहे. त्यातील शरीरातील सर्वच महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. लिव्हरचे कार्य बिघडल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचे काम लिव्हर करते. याशिवाय रक्त शुद्ध करून आरोग्य निरोगी ठेवण्याचे महत्वपूर्ण काम लिव्हर करते. त्यामुळे लिव्हरच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून गेले नाहीतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लिव्हरमध्ये साचून राहिलेले विषारी घटक काढून टाकण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया घरगुती उपाय.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
दैनंदिन आहारात शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते शिवाय आरोग्याला अनेक फायदे होतात. वातावरणात गारवा असल्यामुळे पाण्याचे कमी प्रमाणात सेवन केले जाते. पण असे न करता शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी प्यावे. लिव्हरचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी गरम किंवा कोमट पाण्याचे सेवन करावे. यामुळे तुम्ही सकाळी उठल्यानंतर गरम किंवा कोमट पाण्याचे सेवन करावे.
तासनतास एकाच जागेवर बसून राहिल्यामुळे शरीरातील हालचाली कमी होऊन जातात. ज्यामुळे आरोग्य बिघडते आणि अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यासाठी आणि लिव्हरमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित योग करणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी करून पाहा ‘हे’ घरगुती उपाय
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आल्याचे किंवा लिंबाच्या पाण्याचे हळद टाकून सेवन करावे. यामुळे शरीरातील घाण स्वच्छ होते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. लिंबामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आढळून येते, ज्याचा फायदा आरोग्याला होतो. याशिवाय हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म तसेच कर्क्यूमिन नावाचा घटक आढळून येतो. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी तुम्ही आल्याच्या पाण्याचे सेवांकरू शकता.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात हंगामी फळे मोठ्या प्रमाणावर मिळतात. त्यामध्ये तुम्ही संत्री, लिंबू, आणि द्राक्षे इत्यादी लिव्हरच्या आरोग्यासाठी पौष्टिक असलेल्या फळांचे सेवन करू शकता. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. सकाळच्या नाश्त्यात फळांचे सेवन केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जाईल. शिवाय लिव्हरचे कार्य सुधारण्यास मदत होईल.