सिगारेट न पिता काळे झालेले ओठ सुधारण्यासाठी 'हे' घरगुती उपाय नक्की करा ट्राय
सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी ओठांना लिपस्टिक लावली जाते तर कधी ओठांची काळजी घेण्यासाठी लिपबाम लावून ओठ हायड्रेट ठेवले जाते. चेहऱ्यावरील स्मित हास्य ओठांमुळे अधिक खुलून दिसते. सर्वच महिलांना अभिनेत्रींप्रमाणे सुंदर, चमकदार आणि गुलाबी ओठ हवे असतात. सतत चहा कॉफी, सिगारेट, सतत उन्हात फिरणे किंवा ओठांची योग्य काळजी न घेतल्यामुळे ओठ अतिशय काळे आणि निस्तेज होऊन जातात. काळे झालेले ओठ पुन्हा सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी लिपमास्क लावला जातो तर कधी वेगवेगळे लिपबाम लावून ओठांची काळी घेतली जाते. पण चुकीचे स्किन केअर प्रॉडक्ट लावल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काळे झालेले ओठ सुधारण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
साखरेमध्ये असलेले गुणधर्म ओठांच्या आरोग्यासाठी प्रभावी ठरतात. ओठांवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी तुम्ही साखरेचा स्क्रब ओठांवर लावू शकता. यासाठी टोपात पाणी घेऊन त्यात साखर टाकून व्यवस्थित मिक्स करा. साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर त्यात मध घालून मिक्स करून घ्या. साखरेचा पाक तयार झाल्यानंतर गॅस बंद करून थंड करा. तयार केलेले मिश्रण ओठांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे ओठांवर जमा झालेली डेड स्किन निघून जाईल आणि तुमचे ओठ चमकदार, गुलाबी होतील. हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास ओठांवर वाढलेला काळेपणा कमी होईल.
आरोग्यासाठी बीटचा रस अतिशय प्रभावी आहे. बीटमध्ये असलेले गुणधर्म ओठ सुंदर आणि चमकदार करण्यासाठी मदत करतात. यामुळे ओठांना नैसर्गिक रंग येतो. बीटमध्ये असलेले बीटॅनिन नावाचं रंगद्रव्य ओठांवर पिगमेंटेशन कमी करून ओठ सुंदर आणि गुलाबी करण्यास मदत करते. यासाठी बीटचा ताजा रस ओठांवर रात्री झोपण्याआधी लावून ठेवा. सकाळी उठल्यानंतर पाण्याने धुवून टाका. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास ओठ चमकदार होतील.
त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो. लिंबाच्या वापरामुळे ओठांवर वाढलेला काळेपणा कमी होण्यास मदत होते. यामधील नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म काळे डाग कमी करतात. यासाठी वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात मध मिक्स करून ओठांवर लावून घ्या. यामुळे ओठांची चमक वाढेल.
गुलाबाच्या पाकळ्या ओठांवर नैसर्गिक सौंदर्य कायम टिकवून ठेवतात. यामुळे काळे झालेले ओठ पुन्हा उजळण्यास मदत होते. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या दुधामध्ये २ तास भिजत ठेवा. त्यानंतर त्यात जाडसर पेस्ट बनवून ओठांवर लावून घ्या आणि २० मिनिटानंतर ओठ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे ओठांवर वाढलेला काळेपणा, कोरडेपणा दूर होण्यास मदत होईल.