रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू नये म्हणून नियमित करा 'या' पेयांचे सेवन
भारतासह जगभरात सगळीकडे मधुमेहाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे शरीरातील इतर अवयवांनासुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. रक्तातील साखर वाढल्यानंत योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. रीरातील ब्लड शुगर लेव्हल जरी टाईप-२ मधुमेहाइतकी नसली तरीसुद्धा ती सामान्यापेक्षा जास्त असते. मधुमेह झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. सतत चक्कर येणे, जखमा लवकर बऱ्या न होणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तातील साखर वाढल्यानंतर ती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या पेयांचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारलं भाजी अतिशय प्रभावी आहे. यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी कारल्याच्या रसाचे सेवन करावे. कारल्याच्या रसाचे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. कारल्यामध्ये चरँटिन आणि मोमोर्डिसिन नावाचे घटक आढळून येतात, ज्यामुळे रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहते.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कारल्याच्या रसाचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. कारल्याचा रस तयार करताना कारल्याच्या आतील बिया काढून बारीक तुकडे करा. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात कारल्याचे तुकडे आणि पाणी घेऊन बारीक वाटून घ्या. त्यानंतर गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या. तयार केलेला रस रिकाम्या पोटी प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील.
शरीरात वाढलेला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. मेथीच्या दाण्यांमध्ये असलेले घटक शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहेत. तसेच यामध्ये असलेल्या फायबरमुळे शरीर स्वच्छ होते. मेथीमध्ये सोल्युबल फायबर भरपूर प्रमाणावर आढळून येते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते, भूक नियंत्रणात राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात.
शरीरात निर्माण झालेला शारीरिक हालचालींचा अभाव आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतो. कारण दीर्घकाळ एकच जागेवर बसून राहिल्यामुळे अन्नपदार्थ पचन होण्यास जास्तीचा वेळ लागतो. याशिवाय काहीवेळा पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर व्यायाम, योगासने किंवा शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहेत.