चेहऱ्यावरील रंग काढून टाकण्यासाठी करून पहा हे घरगुती उपाय:
संपूर्ण देशभरात आज मोठ्या आनंद आणि उत्साहात होळी सण साजरा केला जात आहे. धुलिवंदच्या दिवशी राज्यातील सर्वच भागांमध्ये एकमेकांना रंग लावत होळी खेळली जाते. लाल, गुलाबी, पिळा, हिरवा इत्यादी सर्वच रंगाचा वापर होळी खेळताना केला जातो. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रंग उपलब्ध असतात. केमिकलयुक्त रंग, हर्बल रंग, फुलांचा वापर कारून बनवण्यात आलेले रंग इत्यादी रंगाचा वापर करत होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र होळी खेळून आल्यानंतर चेहऱ्यावर किंवा अंगाला लागलेला रंग लवकर निघून जात नाही. अशावेळी महिला वेगवेगळ्या पदार्थांचा, साबणाचा वापर करतात. पण हानिकारक केमिकलचा वापर करून बनवण्यात आलेले त्वचेसाठी अतिशय घातक आहे. यामुळे त्वचा खराब होऊ शकते. त्वचा खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.(फोटो सौजन्य-istock)
होळी खेळून आल्यानंतर चेहऱ्यावर किंवा अंगावर तसाच राहिलेला रंग काढण्यासाठी कोणत्याही चुकीच्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर तसाच राहिलेला होळीचा रंग काढून टाकण्यासाठी घरगुती फेसपॅक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या फेसपॅकच्या वापरामुळे त्वचेवरील रंग सहज निघून जाईल आणि चेहरा स्वच्छ सुंदर दिसेल. त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवू लागल्यानंतर केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थ वापरावे.
होळी खेळायला जाण्याआधी संपूर्ण शरीराला तेल लावून घ्यावे. तेल लावल्यामुळे त्वचेचा रंग सहज निघतो. याशिवाय होळी खेळून आल्यानंतर चेहरा रंग निघत नसल्यास पुन्हा एकदा तेल लावून मालिश करावी. यामुळे चेहऱ्यावर लागलेला सर्व रंग नाहीसा होईल आणि तुम्ही पुन्हा एकदा पाहिल्यासारख्या दिसाल.
त्वचेवर तेलाची मसाज केल्यानंतर काहीवेळ तेल तसेच ठेवा आणि त्यानंतर सुक्या कापडाने चेहऱ्यावर लागलेला रंग हलक्या हाताने काढा.
फेसपॅक तयार करण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये मुलतानी माती घेऊन त्यात बेसन टाका आणि मिक्स करा. मिक्स केल्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद टाकून वरून दूध टाकून मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर तयार करून घेतलेल्या मिश्रणाची जाडसर पेस्ट तयार होईल. संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. १५ मिनिटं ठेवून नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय केल्यास त्वचेवर चिटकून राहिलेला रंग कायमचा गायब होईल आणि त्वचा स्वच्छ दिसेल.