काळ्याभोर आणि मजबूत केसांसाठी कोरफडच्या रसात मिक्स करा 'हे' घरगुती पदार्थ
वाढत्या उन्हाचा परिणाम आरोग्यासह केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. उन्हात जाऊन आल्यानंतर केस लगेच कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. केस कोरडे झाल्यानंतर ते सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही करतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात तर कधी हेअरमास्क लावून केसांची काळजी घेतली जाते. मात्र केसांना सूट न होणाऱ्या प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केस आणखीनच खराब होऊन जातात. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात.(फोटो सौजन्य-istock)
केसांच्या वाढीसाठी बाजारात अनेक वेगवेगळे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. मात्र केसांना वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे जास्त आवश्यक आहे. दैनंदिन आहारात केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला मजबूत आणि चमकदार केसांसाठी कोरफडचा रसात कोणते घरगुती पदार्थ मिक्स करून लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
मागील अनेक वर्षांपासून केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कोरफड जेलचा वापर केला जात आहे. यामध्ये असलेल्या घटकांमुळे केस हायड्रेट आणि मऊ राहतात. केसांच्या मुळांना खोलवर पोषण मिळते. टाळूवरील कोंडा कमी करण्यासाठी कोरफड जेल लावावे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोरफड जेल केसांवर लावल्यास केस मऊ होऊन टाळूवर कोंडा निघून जाईल. यामध्ये असलेले प्रोटीओलाइटिक एंजाइम केसांना ऊर्जा देतात.
केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात नारळाचे तेल मिक्स करून केसांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर १ तास कोरफड जेल केसांवर लावून तसेच ठेवा. यामुळे टाळूवरील कोंडा कमी होईल आणि केसांना पोषण मिळेल. त्यानंतर १ तासांनी केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. केस स्वच्छ करताना शँम्पूचा वापर करावा.
कांद्याच्या रसात असलेले गुणधर्म टाळूला पोषण देतात. याशिवाय टाळूवरील कोरडेपणा कमी होतो. वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात कांद्याचा रस मिक्स करा. तयार केलेले मिश्रण केसांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर १५ मिनिटं ठेवून शॅम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्यास टाळूवरील कोंडा कमी होण्यासोबतच केसांना पोषण मिळेल आणि केस मजबूत आणि चमकदार होतील.