काय आहे ट्युबरक्युलोसिस
भारतात क्षयरोग अर्थात ज्याला इंग्रजीमध्ये ट्युबरक्युलोसिस म्हटले जाते हा आजार दिवसेंदिवस गंभीर संकट होत चालल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, 2021 ते 2040 दरम्यान भारतात 62 दशलक्ष टीबीचे रुग्ण आणि 80 लाख मृत्यू अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होणार आहे, ज्यामुळे 146 अब्ज डॉलर्स अर्थात सुमारे 12 लाख कोटी रुपये GDP चे नुकसान होण्याची शक्यता आहे.
टीबी हा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे, जो संक्रमित व्यक्ती खोकतो, शिंकतो किंवा बोलतो तेव्हा हवेतून पसरतो. हे प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करते, परंतु शरीराच्या इतर भागांमध्येदेखील पसरू शकते. टीबीच्या सामान्य लक्षणांमध्ये सतत खोकला, छातीत दुखणे, ताप आणि थकवा यांचा समावेश होतो. यावर वेळीच उपचार न केल्यास ते प्राणघातक ठरू शकते, जाणून घेऊया अधिक माहिती (फोटो सौजन्य – iStock)
गरीब वर्ग अधिक प्रभावी
लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनच्या संशोधकांचाही समावेश असलेल्या या अभ्यासात क्षयरोगाचा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांवर सर्वाधिक परिणाम होईल असे म्हटले आहे. या कुटुंबांवर आरोग्याशी संबंधित समस्यांचा मोठा भार असेल, तर उच्च उत्पन्न गटाला आर्थिक भार सहन करावा लागेल.
चिंता वाढली – जगातील एक तृतीयांश टीबी पेशंट भारतात त्यात कोरोनाबाधितांनाही आहे क्षयरोगाचा धोका
टीबीची कारणे
क्षयरोगाची इतर कारणे देखील असू शकतात:
ट्युबरक्युलोसिसची लक्षणे
क्षयरोगाची लक्षणे त्याच्या प्रकारावर आणि प्रभावित अवयवावर अवलंबून असतात. क्षयरोगाची प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.
पल्मोनरी टीबीची लक्षणे:
अभ्यासानुसार, जर भारताने जागतिक आरोग्य संघटनेचे ‘एंड-टीबी’ 90 टक्के शोधण्याचे आणि प्रभावी उपचारांचे लक्ष्य पूर्ण केले, तर क्षयरोगाशी संबंधित आजार आणि मृत्यू 75 टक्क्यांनी कमी होऊ शकतात 90 टक्के पर्यंत असे सांगण्यात आले आहे.
लग्नानंतरही मूल होत नाही का? 100 पैकी 10 जण ‘या’ आजाराने ग्रस्त, ही लक्षणे दिसताच वेळीच सावध व्हा!
सुधारण्यासाठी काय करावे
टीबीच्या विरोधात आर्थिक गुंतवणूक वाढवण्याची गरज असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. या अंतर्गत रुग्णांची लवकर तपासणी, औषध-प्रतिरोधक क्षयरोगावर उपचार आणि 95 टक्के प्रभावी पॅन-टीबी उपचारांची अंमलबजावणी याला प्राधान्य दिले पाहिजे, असे केल्यास, $124.2 बिलियन पर्यंतचे आर्थिक नुकसान टाळता येईल.






