Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्ही दिवसभराच्या आहारातून किती कॅलरीज घेता? वजन कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी काय आहे नेमके कॅलरी इनटेकचे गणित! समजून घ्या

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अन्नातून मिळणाऱ्या 'कॅलरी इन' आणि व्यायामाद्वारे जळणाऱ्या 'कॅलरी आऊट'चा समतोल राखणे गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी आणि वजन वाढवण्यासाठी किती कॅलरीज जास्त घेणे फायदेशीर ठरते ते आज इथे पाहूयात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 10, 2026 | 09:56 PM
तुम्ही दिवसभराच्या आहारातून किती कॅलरीज घेता? वजन कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी काय आहे नेमके कॅलरी इनटेकचे गणित! समजून घ्या
Follow Us
Follow Us:
  • निरोगी शरीरासाठी दैनंदिन हालचाली आणि जैविक प्रक्रियांसाठी आवश्यक असलेल्या आहारातील कॅलरीजचे योग्य प्रमाण समजून घेणे आवश्यक आहे.
  • वजन कमी करण्यासाठी कॅलरी डेफिसिट तर स्नायू आणि वजन वाढवण्यासाठी कॅलरी सरप्लस आहार घेणे अत्यंत प्रभावी ठरते.
  • केवळ कॅलरीज मोजण्याऐवजी प्रथिनांनी समृद्ध आणि पौष्टिक अन्नाचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते.

आपल्या शरीराला दैनंदिन कामे करण्यासाठी, श्वासोच्छवास आणि पचनक्रियेसारख्या मूलभूत जैविक प्रक्रियांसाठी ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा आपल्याला अन्नातून मिळते, ज्याला आपण कॅलरी म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, कॅलरी हे आपल्या शरीराचे इंधन आहे. पण वजन कमी करणे किंवा वाढवणे हे या कॅलरीच्या गणितावरच अवलंबून असते.

काय आहे ‘कॅलरी इनटेक‘चे गणित?

तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी ‘कॅलरी इन’ आणि ‘कॅलरी आऊट’ या दोन गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.

  • कॅलरी इन: आपण दिवसभरात खाल्लेल्या अन्नातून आणि पिण्यातून मिळणाऱ्या कॅलरीज.
  • कॅलरी आऊट: व्यायाम, शारीरिक हालचाली आणि शरीराच्या अंतर्गत कार्यांमुळे जळणाऱ्या कॅलरीज.
चहाऐवजी सकाळी उठल्यानंतर करा ‘या’ हेल्दी पेयांचे सेवन, पचनक्रिया निरोगी राहण्यासोबत शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा

१. वजन मेंटेन ठेवण्यासाठी

जितक्या कॅलरीज तुम्ही अन्नातून घेता, तितक्याच कॅलरीज जर शारीरिक हालचालींद्वारे वापरल्या गेल्या, तर तुमचे वजन स्थिर राहते. याला ‘मेंटेनन्स कॅलरीज’ म्हणतात. एका सामान्य पुरुषाला दिवसभरात सुमारे २००० ते २५०० कॅलरीज, तर स्त्रीला १८०० ते २००० कॅलरीजची गरज असते. हे प्रमाण वयानुसार, उंची-वजनानुसार, दिनचर्येतील कामाच्या तीव्रतेनुसार बदलते.

२. वजन कमी करण्यासाठी – Calorie Deficit

वजन कमी करायचे असेल तर शरीराला लागणाऱ्या मेंटेनन्स कॅलरीजपेक्षा ३०० ते ५०० कॅलरीज कमी खाणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही कमी कॅलरीज घेता, तेव्हा शरीर उरलेली ऊर्जा मिळवण्यासाठी साठवलेली चरबी जाळू लागते. त्यामुळे हळूहळू वजन कमी होते.

वयाच्या ५० व्या वर्षीसुद्धा कायमच राहाल फिट आणि हेल्दी! आतडे स्वच्छ करण्यासाठी नियमित खा ‘हे’ खास पदार्थ, शरीराला मिळेल पोषण

३. वजन वाढवण्यासाठी – Calorie Surplus

वजन वाढवायचे असल्यास मेंटेनन्स कॅलरीजपेक्षा ३०० ते ५०० कॅलरीज जास्त घेणे गरजेचे असते. या एक्स्ट्रा कॅलरीज योग्य व्यायामासोबत घेतल्यास शरीरात मसल आणि सुदृढ वजन वाढण्यास मदत होते.

लक्षात ठेवा

फक्त कॅलरीज मोजणे पुरेसे नाही, तर अन्नाची गुणवत्ताही महत्त्वाची आहे. जंक फूडऐवजी प्रोटिन, फायबर, हिरव्या भाज्या, फळे आणि तांदूळ/गहू यांसारख्या पौष्टिक पदार्थांमधून कॅलरीज मिळवणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.योग्य आहार आणि नियमित व्यायाम या जोडगोळीनेच तुम्ही तुमचे वजन आणि आरोग्य चांगले ठेवू शकता.

Web Title: Understanding calorie intake for weight loss and gain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 09:56 PM

Topics:  

  • gymnastics
  • health
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

LGBTQ+ ची सुरुवात L नेच का होते? जाणून घ्या यामागची संघर्षमय कथा
1

LGBTQ+ ची सुरुवात L नेच का होते? जाणून घ्या यामागची संघर्षमय कथा

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार
2

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर
3

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
4

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.