घरातील फ्रीजचा 'या' पद्धतीने वापर केल्यास उद्भवेल मूत्रमार्गाचा संसर्ग
बाजारातून विकत आणलेल्या भाज्या, फळे आणि घरातील इतर अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी फ्रीजचा वापर केला जातो. फ्रिजमध्ये वस्तू अधिककाळ व्यवस्थित टिकून राहते. पण घरी शिजवलेले अन्नपदार्थ फ्रिजमध्ये ठेवून नंतर खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. चुकीच्या पद्धतीने फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवलेले अन्नपदार्थ खाल्यामुळे महिलांना मूत्रमार्गाचे इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. फ्रिजमध्ये तयार होणारे बॅक्टरीया लवकर अन्नपदार्थ सडवून टाकतात आणि तेच अन्नपदार्थ पोटात गेल्यानंतर वारंवार युरिन इन्फेक्शनचा त्रास होतो. फ्रिजमध्ये चुकीच्या पद्धतीने ठेवलेले अन्नपदार्थ आरोग्य हानी पोहचवतात. त्यामुळे घरातील फ्रिज कायमच स्वच्छ असणे आवश्यक आहे. फ्रिजमधून निर्माण होणारे बॅक्टेरिया लघवीतील इन्फेक्शन होण्यास कारणीभूत ठरतात.(फोटो सौजन्य – istock)
सावधान! ‘या’ पद्धतीने दही खाल्ल्यास आतड्यांमध्ये बसेल पीळ, जाणून घ्या दही खाण्याची योग्य वेळ
फ्रिजमध्ये कच्चे मांस, अंडी, भाज्या किंवा पॅक्ड फूड ठेवण्याची अनेकांना सवय असते. तसेच घरातआणलेले सर्वच पदार्थ जास्त वेळ टिकण्यासाठी फ्रीजचा वापर केला जातो. पण चुकीच्या पद्धतीने अन्नपदार्थ साठवून ठेवल्यास बॅक्टेरिया फ्रिजच्या शेल्फ्स, डबे किंवा प्लास्टिक पॅकेजिंग मोठ्या प्रमाणावर साचतात. त्यानंतर अन्नपदार्थांचे सेवन केल्यास हेच बॅक्टरीया पोटात जातात आणि पोटाला हानी पोहचते. शरीरात बॅक्टरीयांनी प्रवेश केल्यानंतर ते युरिनरी ट्रॅक्टमध्ये जातात आणि नंतर इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते.
बाजारातून विकत आणलेले, घरी बनवलेले किंवा इतर सर्वच पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नये. तसेच घरातील फ्रिज कायमच स्वच्छ असावा. अंडी, मांस किंवा डेअरी पदार्थ व्यवस्थित स्वच्छ डब्यांमध्ये भरून ठेवावा. हे पदार्थ फ्रिजमध्ये उघडे ठेवल्यास सगळीकडे वास येण्याची जास्त शक्यता असते. प्लास्टिक ट्रे, रॅक आणि दरवाज्याच्या सीलमध्ये जमा झालेली घाण कॉटनचा कापड घेऊन व्यवस्थित स्वच्छ करावी. यामुळे फ्रिजमधील विषाणू अन्नपदार्थांमध्ये जात नाहीत.
प्रत्येक आठवड्याला पाण्यात बेकिंग सोडा किंवा मीठ टाकून तयार केलेल्या पाण्याने फ्रिज स्वच्छ ठेवावा. यामुळे फ्रिजमध्ये साचून राहिलेले बॅक्टरीया नष्ट होण्यास मदत होते आणि फ्रिज स्वच्छ राहतो. अंडी, मांस किंवा डेअरी पदार्थ कोणत्याही प्लास्टिक डब्यात न ठेवता एअरटाइट डब्यांमध्ये साठवून ठेवावे. याशिवाय बाजारातून विकत आणलेल्या भाज्या, फळे किंवा इतर कोणतेही पदार्थ व्यवस्थित स्वच्छ करून नंतरच फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे भाज्या आणि फळे व्यवस्थित टिकून राहतील.
UTI ची कारणे काय आहेत?
महिलांमध्ये पुरुषांपेक्षा मूत्रमार्ग लहान असल्याने, जीवाणूंना मूत्राशयात किंवा मूत्रपिंडात पोहोचणे सोपे होते, ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. मधुमेह, मूत्रमार्गातील खडे, किंवा मूत्रमार्गाच्या शस्त्रक्रियेमुळे देखील UTI होऊ शकतो.
UTI चा उपचार कसा केला जातो?
डॉक्टर सामान्यतः प्रतिजैविके लिहून देतात, जे जीवाणू मारून संसर्गावर उपचार करतात. भरपूर पाणी प्यायल्याने जीवाणू शरीरातून बाहेर काढण्यास मदत होते. पॅरासिटामॉल सारखी वेदना कमी करणारी औषधे वेदना कमी करण्यास मदत करतात.
UTI गंभीर झाल्यास काय होते?
जर UTI वेळेवर उपचार न केल्यास, ते मूत्रपिंडात पसरू शकते आणि गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकते.