डेड स्किन घालवण्यासाठी सोपे उपाय
वय वाढल्यानंतर त्वचेमध्ये अनेक बदल होण्यास सुरुवात होते. त्वचेमध्ये होणाऱ्या बदलांकडे अनेकदा महिला दुर्लक्ष करतात. मात्र हेच छोटे बदल पुढे जाऊन मोठे होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.मी महिला त्वचा सुंदर दिसण्यासाठी सतत काहींना काही उपाय करत असतात. मात्र तरीसुद्धा त्वचा सुंदर आणि चमकदार दिसत नाही. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या ब्युटी क्रीम्स आणून लावतात. मात्र या सगळ्याचा काहीच परिणाम त्वचेवर दिसत नाही. केमिकल युक्त प्रॉडक्टमुळे सुंदर त्वचा खराब होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्वचेसंबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कोणत्या फळाच्या सालीचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
केळी खाल्ल्यानंतर केळ्याची साल फेकून दिली जाते. मात्र असे न करता तुम्ही केळीच्या सालीचा वापर त्वचेच्या समस्येंपासून सुटका मिळवण्यासाठी करू शकता. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि सुंदर होईल. यासाठी केळीची साल घेऊन त्याच्या आतील भाग हळुवार हाताने चेहऱ्यावर लावून मसाज करा. 10 nमिनिटं मसाज केल्यानंतर काहीवेळ त्वचा अशीच ठेवून नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या. यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकपणे सुंदर आणि चमकदार दिसेल.
उन्हात गेल्यामुळे किंवा वातावरणातील बदलांमुळे त्वचा काळवंडून जाते. काळी पडलेली त्वचा उजळ्वण्यासाठी महिला सतत काहींना काही करत राहतात. मात्र असे करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेच्या आरोग्याची काळजी घ्यावी. काळी पडलेली त्वचा उजळ्वण्यासाठी केळीची साल घेऊन त्याच्या आतील भाग त्वचेवर हळुवार हाताने लावून मसाज करा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय केल्यामुळे त्वचेवरील टॅनिंग निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ दिसेल.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. मात्र हे उपाय करण्याऐवजी केळीच्या सालीचा वापर करून त्वचा उजळदार बनवा. यासाठी केळीच्या सालीच्या आतील भाग त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे डेड स्किन निघून जाऊन त्वचा चमकदार होईल.