घरच्या घरी ब्रायडल ग्लोसाठी वापर 'हा' फेसपॅक
सर्वच महिला सुंदर दिसण्यासाठी सतत काहींना काही करत असतात. लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे या दिवशी सगळ्यांचं खूप सुंदर आणि आकर्षक दिसायचं असत. लग्नाच्या काही दिवस आधीपासूनच त्वचा आणि केसांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतली जाते. लग्नाच्या आधी मुली केसांपासून ते नखांपर्यंत सगळ्याचं गोष्टींसाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. यात त्वचेच्या आरोग्याकडे सर्वाधिक लक्ष दिले जाते. सुंदर आणि डाग विरहित त्वचेसाठी आहारात बदल करून त्वचेची काळजी घेतली जाते. मात्र काही मुली त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन ब्राइटनिंग क्रीम्स लावतात, वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट करून घेणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र यामुळे काहीकाळ त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते. मात्र कालांतराने त्वचेवर पिंपल्स किंवा इतर समस्या उद्भवू लागतात. (फोटो सौजन्य – iStock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
लग्नाआधी त्वचेची काळजी घेताना केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करूनसुद्धा त्वचा चमकदार आणि सुंदर होते. आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन, भरपूर पाण्याचे सेवन करणे, त्वचेला सूट होतील असे स्किन केअर प्रॉडक्ट वापरणे इत्यादी गोष्टी केल्यास त्वचा सुंदर आणि चमकदार राहते. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी ब्रायडल ग्लो मिळवण्यासाठी होममेड फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या फेसपॅकचा वापर केल्यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होईल. चला तर जाणून घेऊया.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
तयार केलेला फेसपॅक आठवड्यातून दोनदा त्वचेवर लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग, पिग्मेंटेशन कमी होऊन त्वचा सुंदर आणि उजळदार होईल. शिवाय त्वचेसंबंधित सर्व समस्या कमी होण्यास मदत होईल. फेसपॅक संपूर्ण त्वचेवर लावून घ्या. त्यानंतर काहीवेळ ठेवून नंतर हलक्या हाताने मसाज करा. नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे लग्नाआधी त्वचेवर चमकदार ग्लो येईल. नियमित तयार केलेला फेसपॅक लावल्यास त्वचेवर चमकदार ग्लो येईल.