तमालपत्राचा वापर करून घरीच बनवा नॅचरल हेअर सीरम
हिवाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये केसात खूप जास्त कोंडा होतो. थंडीत केसांची मूळ कोरडी झाल्यानंतर केस खूप जास्त निस्तेज वाटू लागतात. अशावेळी महिला बाजारातील हेअर केअर ट्रीटमेंट किंवा हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण सतत चुकीच्या आणि केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केसांना हानी पोहचण्याची शक्यता असते. केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर केस मोठ्या प्रमाणावर गळतात. यामुळे काहीवेळा केसांमध्ये टक्कल पडेल की काय अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण होते. महिलांसह पुरुषांसुद्धा केसांसंबधित समस्या वारंवार उद्भवतात. मात्र सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालातंराने केसांची वाढ खुंटल्यानंतर केस विचित्र दिसू लागतात. केसांमध्ये कोंडा, खाज, कोरडेपणा आणि वाढ खुंटणे इत्यादी समस्या कोणत्याही वयातील महिलांमध्ये दिसू लागतात. त्यामुळे केसांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
Lifestyle Tips: कोर्टिसोलमुळे वाढतोय ताण! काय आहे हा अनोखा घटक? जाणून घ्या
केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल युक्त हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र असे न करता स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर केसांसाठी करावा. यामुळे केसांमध्ये नैसर्गिक चमक कायम टिकून राहते. आज आम्ही तुम्हाला तमालपत्राचा वापर करून हेअर सीरम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तमालपत्राचा वापर करून बनवलेले हेअर सीरम रात्री झोपण्याआधी नियमित केसांवर लावावे. यामध्ये असलेले नैसर्गिक गुणकारी घटक केसांच्या वाढीवर परिणाम करतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
घरगुती हेअर सीरम बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या टोपात ग्लासभर पाणी घेऊन त्यात मेथी दाणे आणि कलोंजी घालून उकळवून घ्यावी. त्यानंतर त्यात तमालपत्राची पाने घालून उकळावे. एक उकळी आल्यानंतर लवंग काड्या घालून टोपातील पाणी अर्धा होईपर्यंत उकळवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करून पाणी थंड करावे. थंड झालेले पाणी गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. रात्री झोपण्याआधी नियमित हेअर सीरम केसांवर लावून हलकासा मसाज करा. यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा नष्ट होईल आणि केसांची झपाट्याने वाढ होईल.
1 रुपयाही खर्च होणार नाही, चेहऱ्यावरील सर्व डाग होतील दूर… फक्त बाल्कनीतील या पानांचा वापर करा
केसांच्या वाढीसाठी हेअर सीरम अतिशय फायदेशीर ठरते. हेअर सीरम नियमित लावल्यास आठवडाभरात सकारात्मक परिणाम दिसून येतील आणि केसांची झपाट्याने वाढ होईल. तमालपत्रामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे टाळूवर वाढलेला कोंडा आणि केसांमध्ये वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होते. याशिवाय मेथी दाण्यांमध्ये प्रथिने आणि निकोटिनिक ॲसिड भरपूर असते, यामुळे केस गळणे थांबते. केसांमधील रक्तभिसरण सुधारण्यासाठी लवंग केसांच्या मुळांपर्यंत पोषण देते.






