Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावरील ग्लो कमी झाला आहे? घरच्या घरी ब्रायडल ग्लोसाठी वापर ‘हा’ फेसपॅक, त्वचा होईल चमकदार

लग्नामध्ये सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. त्यामुळे लग्नाआधी त्वचेवर ब्रायडल ग्लो मिळवण्यासाठी घरच्या घरी फेसपॅक बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. हा फेसपॅक नक्की वापरून पहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 06, 2025 | 10:11 AM
घरच्या घरी ब्रायडल ग्लोसाठी वापर 'हा' फेसपॅक

घरच्या घरी ब्रायडल ग्लोसाठी वापर 'हा' फेसपॅक

Follow Us
Follow Us:

सर्वच महिला सुंदर दिसण्यासाठी सतत काहींना काही करत असतात. लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे या दिवशी सगळ्यांचं खूप सुंदर आणि आकर्षक दिसायचं असत. लग्नाच्या काही दिवस आधीपासूनच त्वचा आणि केसांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतली जाते. लग्नाच्या आधी मुली केसांपासून ते नखांपर्यंत सगळ्याचं गोष्टींसाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. यात त्वचेच्या आरोग्याकडे सर्वाधिक लक्ष दिले जाते. सुंदर आणि डाग विरहित त्वचेसाठी आहारात बदल करून त्वचेची काळजी घेतली जाते. मात्र काही मुली त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन ब्राइटनिंग क्रीम्स लावतात, वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट करून घेणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र यामुळे काहीकाळ त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते. मात्र कालांतराने त्वचेवर पिंपल्स किंवा इतर समस्या उद्भवू लागतात. (फोटो सौजन्य – iStock) 

स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

लग्नाआधी त्वचेची काळजी घेताना केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करूनसुद्धा त्वचा चमकदार आणि सुंदर होते. आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन, भरपूर पाण्याचे सेवन करणे, त्वचेला सूट होतील असे स्किन केअर प्रॉडक्ट वापरणे इत्यादी गोष्टी केल्यास त्वचा सुंदर आणि चमकदार राहते. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी ब्रायडल ग्लो मिळवण्यासाठी होममेड फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या फेसपॅकचा वापर केल्यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होईल. चला तर जाणून घेऊया.

साहित्य:

  • मुलतानी माती
  • बेसन
  • आंबेहळद
  • गुलाब पाणी
  • गुलाबाच्या पाकळ्या
  • पाणी

कृती:

  • फेसपॅक तयार करण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये मुलतानी माती, बेसन, आंबेहळद घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून टाका.नंतर त्यात गुलाबपाणी टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण 2 तास तसेच ठेवून द्या.
  • नंतर सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट काचेच्या बाटलीमध्ये व्यवस्थित भरून ठेवा.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

फेसपॅक लावण्याची पद्धत:

तयार केलेला फेसपॅक आठवड्यातून दोनदा त्वचेवर लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग, पिग्मेंटेशन कमी होऊन त्वचा सुंदर आणि उजळदार होईल. शिवाय त्वचेसंबंधित सर्व समस्या कमी होण्यास मदत होईल. फेसपॅक संपूर्ण त्वचेवर लावून घ्या. त्यानंतर काहीवेळ ठेवून नंतर हलक्या हाताने मसाज करा. नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे लग्नाआधी त्वचेवर चमकदार ग्लो येईल. नियमित तयार केलेला फेसपॅक लावल्यास त्वचेवर चमकदार ग्लो येईल.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Use this face pack for bridal glow at home home remedies for glowing skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 10:11 AM

Topics:  

  • bridal glow
  • home remedies

संबंधित बातम्या

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा टोमॅटोच्या रसाचा वापर, त्वचेवर येईल इंस्टंट ग्लो
1

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा टोमॅटोच्या रसाचा वापर, त्वचेवर येईल इंस्टंट ग्लो

Homemade Hair Dye: १ रुपयासुद्धा खर्च न करता केस होतील काळेभोर! अक्रोड जास्वंदीच्या पानाफुलांचा वापर करून बनवा नॅचरल हेअर डाय
2

Homemade Hair Dye: १ रुपयासुद्धा खर्च न करता केस होतील काळेभोर! अक्रोड जास्वंदीच्या पानाफुलांचा वापर करून बनवा नॅचरल हेअर डाय

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा ‘या’ चहाचे सेवन, पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी
3

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा ‘या’ चहाचे सेवन, पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी

Firecracker Burn First Aid: दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजला आहे? घाबरून न जाता ‘हे’ घरगुती उपाय केल्यास तातडीने मिळेल आराम
4

Firecracker Burn First Aid: दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजला आहे? घाबरून न जाता ‘हे’ घरगुती उपाय केल्यास तातडीने मिळेल आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.