राईस टोनर बनवण्याची सोपी कृती
वातावरणात होणारे बदल, सतत सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात जाणे, चुकीचा आहारात फॉलो करणे, अपुरी झोप इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शिवाय चुकीच्या गोष्टी फॉलो केल्यामुळे आरोग्यासोबतच त्वचेचे सुद्धा नुकसान होऊ लागते. थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणातील बदलांमुळे त्वचा अधिक कोरडी आणि काळवंडलेली दिसू लागते. अशावेळी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रीम्स आणि केमिकल ट्रीटमेंट करून घेतात. मात्र याचा फारकाळ त्वचेवर प्रभावी दिसून येत नाही. यामुळे त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. त्यामुळे त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केमिकल प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेची काळजी घ्यावी. (फोटो सौजन्य – iStock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी बाजारात अनेक कोरियन प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. कोरियन प्रॉडक्ट प्रामुख्याने तांदळाच्या पाण्यापासून तयार केले जातात. त्यात प्रामुख्याने राईस वॉटर टोनरचा वापर अनेक महिला मोठ्या प्रमाणावर करतात. यामुळे त्वचेवरील टॅनिंग कमी होऊन त्वचा चमकदार आणि सुंदर दिसू लागते. पण बाजारात उपलब्ध असलेले महागडे कोरियन प्रॉडक्ट विकत घेण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी या पदार्थाचा वापर करून राईस टोनर तयार करू शकता. यामुळे तुमच्या त्वचेला पोषण मिळेल आणि त्वचेवरील टॅनिंग निघून जाऊन त्वचा चमकदार आणि सुंदर दिसेल.
त्वचेवरील टॅनिंग घालवण्यासाठी राईस टोनरचा वापर करावा. यासाठी सर्वप्रथम मूठभर तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. 1 कप पाण्यात तांदूळ भिजत ठेवा. अर्धा तास तांदूळ व्यवस्थित भिजल्यानंतर ते गाळून त्यातील पाणी वेगळे करून घ्या. त्यानंतर तयार केलेले पाणी बंद झाकणाच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. हे पाणी नियमित रात्री झोपण्याआधी त्वचेवर लावून झोपा. यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल शिवाय त्वचेवरील टॅन निघून जाईल.
राईस टोनर लावण्याचे फायदे
राईस टोनर बनवण्याची दुसरी पद्धत म्हणजे मूठभर तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवा. 1 तास तांदूळ पाण्यात व्यवस्थित भिजल्यानंतर तांदळाचे पाणी तांदळासहित व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर तयार केलेले पाणी थंड करून त्वचेवर लावा. यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि उजळलेली दिसेल. शिवाय त्वचेवर टॅन निघून जाईल.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
त्वचेवर राईस टोनर लावल्यामुळे चेवर दिसणारे एजिंग साईन्स कमी होऊन त्वचा तरुण दिसण्यास मदत होईल. शिवाय डेड स्किन सेल्स येणार नाहीत. त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार आणि सुंदर दिसते. तसेच त्वचेवरील पिंपल्स कमी होऊन त्वचा स्वच्छ होते.