त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी घरगुती उपाय
वय वाढल्यानंतर त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, बारीक रेषा दिसणे, वांग इत्यादी समस्या उद्भवू लागतात. यामुळे त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे दैनंदिन गोष्टींमध्ये बदल करून आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. चुकीचा आहारात, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, केमिकल प्रॉडक्टचा अतिवापर, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप इत्यादी गोष्टींमुळे आरोग्यसोबतच त्वचेचे सुद्धा नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात बदल करून आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यावी. चुकीच्या गोष्टी फॉलो केल्यामुळे कमी वयातच त्वचेवर सुरकुत्या येऊ लागतात. यामुळे त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. (फोटो सौजन्य – iStock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट वापरतात. मात्र याचा फारसा परिणाम त्वचेवर दिसून येत नाही. त्वचेची काळजी घेण्यासाठी केमिकल प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या अधिक सुंदर आणि चमकदार दिसेल. त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी मधाचा वापर करावा. यामुळे त्वचा उजळदार दिसते आणि त्वचेचे नुकसान होत नाही. शिवाय अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचेवरील डाग घालवण्यासाठी मदत करतात.
त्वचेवर असलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी घरगुती उपाय अतिशय प्रभावी ठरतील. यासाठी मधाचा वापर करावा. वाटीमध्ये १ चमचा मध घेऊन त्यात दही मिक्स करून घ्या. दही मधात व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चेहऱ्यावर लावून घ्यावी. १५ मिनिटं ठेवून नंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन आराम मिळेल.
त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करू शकता. यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते आणि त्वचा उजळदार दिसते. शिवाय मधामध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीसेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकून पडलेली घाण स्वच्छ होते. त्वचेवर ब्लॅकहेड्स आल्यानंतर त्वचा पूर्णपणे खराब होऊन जाते. यासाठी एक चमचा मधात जोजोबा तेल किंवा खोबऱ्याचे तेल मिक्स करून लावा. तयार केलेले मिश्रण डोळ्यांच्या वरच्या भागावर लावून गोलाकार मसाज करा. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतील.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी मधात दूध मिक्स करून लावावे. यामुळे त्वचेवर आलेल्या सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा चमकदार दिसते. यासाठी १ चमचा मधात १ चमचा दूध मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण त्वचेवर लावून काहीवेळ हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन आराम मिळेल. हा उपाय नियमित केल्यास त्वचेवर सुरकुत्या कमी होतील.