Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vatican City: जगातील सर्वात लहान देश, काही तासांचाच प्रवास अन् कमी किमतीतच करता येईल विदेश यात्रा

व्हॅटिकन सिटी हे इटलीची राजधानी रोमच्या मध्यभागी स्थित एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र आहे. हा जगातील सर्वात लहान देश आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीतही सर्वात लहान आहे. कमी बजेटमध्ये तुम्ही इथे अविस्मरणीय ट्रिपचा आनंद लुटू शकत

  • By नुपूर भगत
Updated On: May 02, 2025 | 08:46 AM
Vatican City: जगातील सर्वात लहान देश, काही तासांचाच प्रवास अन् कमी किमतीतच करता येईल विदेश यात्रा

Vatican City: जगातील सर्वात लहान देश, काही तासांचाच प्रवास अन् कमी किमतीतच करता येईल विदेश यात्रा

Follow Us
Close
Follow Us:

इंटरनॅशनल ट्रिप करावी अशी अनेकांची इच्छा असते. मात्र याचा खर्च सामान्यांना परवडण्याजोगा नसतो, ज्यामुळे अनेकांचे हे स्वप्न स्वप्नच बनून राहते. पण आता असे होणार आहे कारण आज आम्ही तुम्हाला जगातील अशा एका सुंदर ठिकाणाविषयी माहिती सांगत आहोत जिथे कमी खर्चात तुम्हाला अविस्मारणीय असा प्रवास करता येईल. व्हॅटिकन सिटी हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर कला, संस्कृती आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातूनही एक अद्भुत ठिकाण आहे. भारतीय प्रवाशांसाठी, येथील सहल एक संस्मरणीय अनुभव असू शकते, तुम्हाला फक्त त्याचे योग्य नियोजन करावे लागेल. भारतीय प्रवासी व्हॅटिकन सिटीला कसे भेट देऊ शकतात. इथे फिरण्यासाठी कोणकोणती पर्यटन स्थळे आहेत आणि व्हिसा प्रक्रिया काय आहे ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

43 देशांना आहे विना व्हिसा अमेरिकेत प्रवास करण्याची परवानगी, भारतही यात सामील? जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

व्हॅटिकन सिटी कुठे आहे?

व्हॅटिकन सिटी हे इटलीची राजधानी रोमच्या मध्यभागी वसलेले एक अत्यंत लहान पण महत्वाचे स्वतंत्र राष्ट्र आहे. केवळ ०.४९ चौ.किमी क्षेत्रफळ असलेले हे जगातील सर्वात लहान देश आहे. येथे अंदाजे ८०० लोकसंख्या आहे आणि ही मुख्यतः चर्चशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी असतात. हे रोमन कॅथोलिक धर्माचे वैश्विक केंद्र म्हणून ओळखले जाते.

भारतातून व्हॅटिकन सिटीला कसे जावे?

भारतातील प्रमुख महानगरांमधून (दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू) रोमच्या लिओनार्डो दा विंची-फ्युमिचिनो (Fiumicino) आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे थेट किंवा एक स्टॉप वाल्या फ्लाइट्स उपलब्ध आहेत. भारतातून रोमला पोहोचण्यास सुमारे १० ते १४ तास लागतात. रोम विमानतळावरून तुम्ही मेट्रो, लोकल ट्रेन, बस किंवा टॅक्सीने सहज व्हॅटिकन सिटीपर्यंत पोहोचू शकता. व्हॅटिकन सिटी रोमच्या अगदी जवळ असून, सेंट पीटर्स बॅसिलिका किंवा सिस्टीन चॅपेलकडे जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक हा एक सोयीस्कर व किफायतशीर पर्याय आहे.

व्हिसा प्रक्रिया काय आहे?

व्हॅटिकन सिटीला भेट देण्यासाठी स्वतंत्र व्हिसा लागत नाही, कारण हे इटलीच्या सीमेमध्ये आहे. त्यामुळे भारतीय प्रवाशांसाठी “शेंजेन व्हिसा” आवश्यक आहे. तुम्ही हा व्हिसा इटालियन दूतावास किंवा VFS Global च्या केंद्रामार्फत मिळवू शकता. अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असते:

  • व्हॅलिड पासपोर्ट (किमान 6 महिने व्हॅलिडिटी असलेला)
  • दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
  • पूर्ण भरलेला व्हिसा अर्ज
  • प्रवास विमा (कमीत कमी 30,000  युरो कव्हरेज असलेला)
  • हॉटेल बुकिंगचे पुरावे
  • विमान प्रवासाचे तपशील
  • बँक स्टेटमेंट (अलीकडील 6 महिन्यांचे)

इन्फ्लुएंसरने दाखवले जगातले सर्वात महाग आणि सोनेजडीत हॉटेल, भाडं इतकं की ऐकूनच हार्ट अटॅक येईल

व्हॅटिकन सिटीतील प्रमुख पर्यटनस्थळे

व्हॅटिकन सिटी धर्म, कला आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून अतिशय समृद्ध आहे. येथे काही प्रमुख आकर्षणे खालीलप्रमाणे:

  • सेंट पीटर्स बॅसिलिका – ख्रिश्चन जगतातील सर्वात भव्य चर्च. येथे पोप आपली धार्मिक प्रवचने देतात.
  • व्हॅटिकन म्युझियम्स – जगातील सर्वोत्तम कला संग्रहालयांपैकी एक, ज्यात माइकेलएंजेलो, राफेल यांच्यासारख्या कलाकारांची अप्रतिम कलाकृती आहेत.
  • सिस्टीन चॅपेल – येथे माइकेलएंजेलोचे सुप्रसिद्ध “The Last Judgment” आणि छतावरील चित्रकाम पाहता येते.
  • व्हॅटिकन गार्डन्स – विश्रांतीसाठी व हरित सौंदर्यासाठी प्रसिद्ध.
  • सेंट पीटर्स स्क्वेअर – पोपची सार्वजनिक भेट किंवा आशीर्वाद घेण्यासाठी लाखो लोक येथे एकत्र येतात.

भारतीय प्रवाशांसाठी सूचना

व्हॅटिकन सिटीला भेट देताना धार्मिक स्थळांचे आदरपूर्वक पालन करणे गरजेचे आहे. ड्रेस कोडचे पालन करणे (खांदे व गुडघे झाकलेले असावेत), शांतता राखणे आणि फ्लॅश फोटोग्राफी टाळणे आवश्यक आहे. हंगामानुसार, विशेषतः उन्हाळ्यात (मे ते ऑगस्ट), येथे गर्दी अधिक असते, त्यामुळे अगोदरच तिकीट बुक करून सकाळी लवकर पोहचणे उत्तम ठरेल.

भारतातून व्हॅटिकन भेट देण्याचा खर्च

  • फ्लाइट्स (राउंड ट्रिप) – 45,000
  • हॉस्टेल (6 रात्री) – 12,000
  • जेवण- 4,000
  • व्हिसा + इन्शुरन्स – 8,000
  • स्थानिक ट्रॅव्हल + टूर – 2,000
  • एंट्री फी (वैकल्पिक) – 1,500
  • एकूण – 72,500 – 80,000

Web Title: Vatican city the smallest country in the world plan a journey in your budget travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 08:46 AM

Topics:  

  • country
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

भारताच अनोखं फ्लोटिंग विलेज, इथे शाळा-बाजार सर्वच पाण्यावर तरंगत; घरांची बदलत राहते लोकेशन
1

भारताच अनोखं फ्लोटिंग विलेज, इथे शाळा-बाजार सर्वच पाण्यावर तरंगत; घरांची बदलत राहते लोकेशन

बजेट कमी आहे? मग टेन्शन नको, फक्त 40,000 रुपयांत पूर्ण होईल या दोन देशांची सफर
2

बजेट कमी आहे? मग टेन्शन नको, फक्त 40,000 रुपयांत पूर्ण होईल या दोन देशांची सफर

Ciel Dubai Marina : आकाशाला भिडणारी आलिशानता; ‘हे’ आहे दुबईतील 377 मीटर उंच आणि भव्यदिव्य हॉटेल
3

Ciel Dubai Marina : आकाशाला भिडणारी आलिशानता; ‘हे’ आहे दुबईतील 377 मीटर उंच आणि भव्यदिव्य हॉटेल

Explore Cambodia : भारत–कंबोडिया दरम्यान आता थेट प्रवास करणे शक्य; इंडिगोने उचलले ‘उड्डाण क्रांतीत’ प्रशंसनीय पाऊल
4

Explore Cambodia : भारत–कंबोडिया दरम्यान आता थेट प्रवास करणे शक्य; इंडिगोने उचलले ‘उड्डाण क्रांतीत’ प्रशंसनीय पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.