(फोटो सौजन्य – Pinterest)
खरं तर तुम्ही जगभरातली अनेक आलिशान हॉटेल्स पाहिली असतील, पण दुबईतील बुर्ज अल अरब हे हॉटेल एक वेगळीच अनुभूती देणारं ठिकाण आहे. जगातील सर्वात महागड्या आणि श्रीमंतीत न्हालेल्या हॉटेल्सपैकी एक असलेलं हे हॉटेल केवळ त्याच्या सौंदर्यासाठीच नव्हे, तर त्याच्या सोन्याच्या थाटासाठीही प्रसिद्ध आहे. संपूर्ण २४ कॅरेट सोन्याने सजवलेलं हे हॉटेल अतिशय भव्य आणि अद्वितीय आहे – विशेषतः त्याच्या प्रसिध्द गोल्डन लिफ्ट, जी पाहिल्यावर कोणाचाही श्वास थांबेल.
इथे येणाऱ्या पाहुण्यांसाठी खाण्यायोग्य सोन्याने सजलेले ड्रिंक्स जसे की गोल्डन एस्प्रेसो मार्टिनी किंवा गोल्ड कॅपुचिनो हे केवळ पेय नसून एक अनुभव असतो. हॉटेलच्या भिंती, फर्निचर, डेकोरपासून ते जेवण देणाऱ्या भांड्यांपर्यंत सर्वत्र सोन्याचा स्पर्श दिसून येतो. हे ठिकाण केवळ आलिशानच नाही, तर एक प्रकारचा राजेशाही अनुभव देतं.
बुर्ज अल अरबमधील प्रत्येक खोली इतकी खास डिझाइन केलेली आहे की ती पाहून तुम्हाला एक क्षण तरी राजवाड्यात असल्यासारखं वाटेल. बाथरूममधील फिटिंग्ज, बेडची रचना, अगदी खुर्च्याही सगळं काही सोन्याच्या सौंदर्याने भरलेलं आहे. काही खोल्यांमधून समोर दिसणारं समुद्राचं दृश्य हे केवळ नयनरम्यच नाही, तर स्वर्गीय वाटेल. हॉटेलची एक रात्र काही विशिष्ट प्रकारच्या खोल्यांसाठी ४८ लाख रुपये खर्च येतो असं म्हटलं जातं – जे एका अनुभवासाठीही पुरेसं आलिशान वाटतं.
बुर्ज अल अरबमधील सुइट्सचे प्रकार:
डुप्लेक्स वन बेडरूम सुइट
स्काय वन बेडरूम सुइट
फॅमिली डुप्लेक्स सुइट
पॅनोरामिक डुप्लेक्स सुइट
क्लब डुप्लेक्स सुइट
टू बेडरूम डुप्लेक्स
स्काय टू बेडरूम फॅमिली सुइट
डिप्लोमॅटिक थ्री बेडरूम सुइट
प्रेसिडेंशियल टू बेडरूम सुइट
खास टूर पॅकेजेस:
जर तुम्ही बुर्ज अल अरबमध्ये वास्तव्यासाठी न गेलात तरीही, तुम्ही हॉटेलचा अनुभव एका खास टूरच्या माध्यमातून घेऊ शकता. या टूरमध्ये खालील गोष्टींचा समावेश असतो:
टूर + Gold Cappuccino
Tour + Golden Espresso Martini
Tour + Golden Colada
Tour + Golden Frappe
Tour + Golden Karak Tea
Tour + Gold Cappuccino & Golden Tiramisu
बुकिंगसाठी वेबसाइट: insidesburjalarab.com
बुर्ज अल अरबला कसे पोहोचायचे?
टॅक्सीने: दुबईतील कोणत्याही भागातून थेट हॉटेलपर्यंत पोहोचणं सोपं आहे.
मेट्रो + टॅक्सी/बस: मेट्रोच्या रेड लाईनवरून मॉल ऑफ द एमिरेट्स येथे उतरून तिथून टॅक्सी किंवा बस (जसे की क्रमांक 81) घेता येते.
उबर किंवा करीम: अॅपद्वारे प्रायव्हेट कॅब बुक करून आरामदायी प्रवास करता येतो
हॉटेलची लक्झरी पिकअप सेवा: जर तुम्ही बुर्ज अल अरबमध्ये प्री-बुकिंग केलं असेल, तर हॉटेलकडून रोल्स रॉयस किंवा हेलिकॉप्टरसारख्या आलिशान वाहनांनी पिकअपची सोय असते.